चाणक्य नीती : सुखी दाम्पत्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारत असो वा परदेश दाम्पत्य जीवनाचा फंडा 100 टक्के सेम आहे. ज्याला सुखी दाम्पत्य जीवनाचा मूलमंत्र गवसला तो साक्षात इंद्रदेवापेक्षाही श्रीमंत असे मानले जाते. दरम्यान चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये (chanakya niti) दाम्पत्य जीवन चांगले बनवण्यासाठी काही गोष्टींचा उल्लेख केला आहे.

चाणक्यांच्या chanakya niti मते, प्रत्येक व्यक्ती आपल्या दाम्पत्य जीवनात सुखी, आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करतो. परंतू यात सर्वांना यश येते असे नाही. ज्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कलह, तणाव, वादविवाद असतो ती व्यक्ती कितीही प्रभावशाली असली तरी त्याला यश मिळत नाही. चाणक्यानुसार मनुष्य हे अनमोल असून जीवनाला सुलभ करण्यास आणि सुंदर बनवण्यातच त्याची सार्थकता आहे. जे लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. चाणक्यांच्या chanakya niti मते, दाम्पत्य जीवन चांगले करण्यासाठी सर्वप्रथम एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही यात यशस्वी झाला तर छोट्या – छोट्या चुकामुळे भांडण होणार नाही. कोणत्याही नात्याला मजबूत करण्यासाठी एक दुस-याला समजून घेणे आवश्यक आहे. दाम्पत्य जीवनात प्रेम असावे. चाणक्यानुसार, प्रेमाला अत्यंत पवित्र मानले जाते. याची पवित्रता जीवनात अनुभवली तर त्यांचे जीवन सूख-शांती पूर्ण होत असते. प्रेमामुळे नात्याला मजबुती आणि परिपक्वता येते. प्रेमात प्रामाणिकपणाही असला पाहिजे, असे चाणक्यानी chanakya niti म्हटले आहे.

Also Read This : 

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

Maharashtra : राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत