तुम्हाला सुखी आयुष्य हवं असेल तर चाणक्यची ‘ही’ गोष्ट ठेवा लक्षात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आचार्य चाणक्यच्या नीतींचे अनुसरण केल्यास एखादी व्यक्ती अनेक संकटांतून मुक्त होऊन सुखी आयुष्य जगू शकते. चाणक्य यांनी आपल्या धोरणात म्हटले की, जे लोक इतरांच्या आनंदावर नाखूष असतात त्यांना जीवनातल्या सुखापासून वंचित ठेवले जाते. चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले की, प्रत्येक मनुष्याने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. चाणक्य नीतिच्या 13 व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात हे वर्णन केले आहे.

अनवस्थितकायस्य न जने न वने सुखम्।
जनो दहति संसर्गाद् वनं संगविवर्जनात।

या श्लोकात, आचार्य चाणक्य दुःख आणि आनंदाविषयी बोलतात की, ज्याचे मन स्थिर नसते, तो इतरांच्या आनंदावर दु: खी असतो. असा व्यक्ती लोकांमध्येही आनंदी नसतो किंवा जंगलातही आनंदी नसतो.

आचार्य चाणक्य सांगू इच्छितात की, आनंद मिळवण्यासाठी मन शांत आणि स्थिर राहावे. ज्या व्यक्तीचे मन स्थिर नसते अशा व्यक्तीला इतर लोकांची भरभराट होताना पाहून अनेकदा शोकांनी वेढलेले असतात. अशा परिस्थितीत तो जंगलात गेला तरी एकटेपणा त्याला त्रास देतो. चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जर व्यक्तीमध्ये समाधानाची भावना नसेल तर आनंद कुठेही मिळणार नाही.