पुण्यात पुन्हा सलग 5 दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पावसाळा संपत आला तरीही मॉन्सूनचा पुण्यात कहर सुरूच आहे. शहर आणि परिसरात आज गुरुवारी (ता. 26) हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस  शुक्रवारी (ता. 27) आणि शनिवारी (ता. 28) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी पडतील,  असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला  आहे.

पुण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या कोसळधारेमुळे पुणेकरांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. कोसळधार पावसामुळे अनेक ठिकाणावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील 12 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस पावसाची 51 ते 75 टक्के शक्‍यता आहे.

या हवामान स्थितीमुळे मुसळधार पावसाची शक्‍यता –

अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, रॉयलसीमा या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती आहे. त्याचवेळी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर चक्रवात आहे. यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर त्यानंतर महिनाखेरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसतील.

Visit : policenama.com