आगामी 24 तासात अनेक राज्यात ‘बर्फवृष्टी’ आणि पावसाचा ‘अंदाज’, तर अनेक राज्यांना थंडी ‘गोठवणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी आहे. तर अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात पुढील 24 तासात जोरदार पावसाचा किंवा बर्फवृष्टी अंदाज आहे. या दरम्यान असाम, मेघालय आणि अरुणाचलच्या विविध भागात विजेच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि पावसांची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते पश्चिम मध्यप्रदेश, कोकण, गोवा, विदर्भ, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात याशिवाय राजस्थान आणि मध्यप्रदेशात रात्री तापमान सामान्यपेक्षा कमी राहिल.

हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पाश्चिम मध्य प्रदेशच्या विविध भागात रात्री तापमान सामान्यापेक्षा अत्यंत कमी राहिल. बिहार, पूर्वी उत्तर प्रदेश, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये काही भागात याशिवाय झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, रायलसीमा या भागात रात्री तापमान सामान्यापेक्षा जास्त असेल.

बिहार, पश्चिम मध्य प्रदेश आणि तमिळनाडू, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड आणि कर्नाटकच्या काही भागात तापमान सामान्यपेक्षा उच्चांकीवर राहिलं. देशातील अन्य भागात तापमान सामान्य राहिले. पूर्वी राजस्थानच्या सीकरमध्ये 2.5 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवणीत आले. पंजाब, हरियाणा, चंदीगड,दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि पूर्व मध्यप्रदेषच्या काही भागात रविवारी दाट धुके पडले होते. तर पश्चिम मध्यप्रदेशात त्यामानाने कमी धुके होते. अमृतसर, लुधियाना, पेंडरा रोड, गंगानगर, चुरु आणि पिलानीमध्ये दृष्यमानता 25 होती.

तर पटियाला, हिसार, भिवानी, पंतनगर, नरनौल आणि सीओनीमध्ये 50 तर बुंदी, शाहाजापूर, भोपालमध्ये दृष्यमानता 200 नोंदवली गेली. उत्तराखंड, पूर्वी उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालच्या पर्वतीय भागात आणि सिक्किममध्ये दाट धुके पसरण्याची शक्यता आहे. हरियाणा, पंजान आणि मध्यप्रेदशच्या काही भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेशच्या काही भागात, झारखंड, तमिळनाडू, लक्षद्विप, बिहार, पंजाब, जम्मू काश्मीर, पूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड. आंध्रप्रदेशच्या किनारी भाग, रायलसीमा आणि केरळमध्ये मागील 24 तास पाऊस झाला तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाट झाला.

आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्किम,ओडिसा, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश, गुजरात, विदर्भ, कोकण, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगाणा, कर्नाटक आणि अंदमान निकोबार द्विप समूहामध्ये हवामान कोरडे आहे.

फेसबुक पेज लाईक करा –