ऑक्टोबरपासून वीज, सीएनजी महागण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

परदेशी बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे किरकोळ सीएनजी, वीज आणि यूरिया उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते. नैसर्गिक वायूच्या घरगुती उत्पादकांना सध्या ३.६ डॉलर प्रति युनिट किंमत मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये या किमतीत १४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

[amazon_link asins=’B01N0WVC16,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’160f5b56-acea-11e8-9fd8-f7dff0c0c57e’]

नव्या दरांची घोषणा येत्या २८ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. भारताला आवश्यक असलेल्या वायूपैकी ५० टक्के वायू आयात केला जातो. या वायूची किंमत घरगुती गॅसच्या किंमतीच्या दुप्पट असते. घरगुती गॅसचे नवे दर येत्या १ ऑक्टोबरपासून पुढील ६ महिन्यांसाठी असणार आहेत. हे नवे दर ऑक्टोबर २०१५ पासून ते मार्च, २०१६ या कालावधीतील दरांच्या तुलनेत सर्वाधिक दर असणार आहेत. ऑक्टोबर, २०१५ ते मार्च, २०१६ या कालावधीत हा दर ३.८२ डॉलर प्रति युनिट होता. नैसर्गिक वायूचे दर वाढण्याने ओएनजीसी आणि रिलायन्सच्या मिळकतीत वाढ होणार आहे. तथापि, यात सीएनजीचाही दर वाढणार आहे. बरोबरच यामुळे यूरिया आणि वीजेच्या उत्पादन खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी यूरिया आणि वीजेच्या दरातही वाढ होणार आहे.

जैन मुनी तरुण सागर यांची प्रकृती खालावली

यापूर्वी, एप्रिल-सप्टेंबर, २०१८ साठी नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करत तो ३.०६ डॉलर प्रति युनिट इतका करण्यात आला होता. गेल्या ६ महिन्याच्या कालावधीत हा दर २.८९ डॉलर प्रति युनिट इतका होता. तीन वर्षांच्या कालावधीतील नैसर्गिक वायूच्या दरातील ही दुसरी वाढ होती. नैसर्गिक वायूच्या किमतींची दर सहा महिन्यांनी समीक्षा केली जाते. त्यानंतर ठरविण्यात येणारे नवे दर अतिरिक्त वायू उपलब्ध असलेल्या अमेरिका, रशिया आणि कॅनडा या देशांच्या केंद्रांवर प्रचलित दरांच्या सरासरीवर अवलंबून असतात.