Chand Nawab | पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचे व्हायरल व्हिडिओचा होणार लिलाव

पोलीसनामा ऑनलाइन – Chand Nawab | काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट आला होता. त्यामध्ये एका पत्रकाराची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं साकारली होती. सिद्दीकीची ही भूमिका पाकिस्तानातील पत्रकार चांद नवाबवरून (Chand Nawab) प्रेरित होती. त्यांच्या रिपोर्टिंगचे धमाल व्हिडीओ साेशल मीडियात तुफान व्हायरल झाले होते.

आता पुन्हा एकदा चांद नवाब चर्चे विषय ठरत आहेत. कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी चांद नवाब यांचा कराची से… वाला व्हिडिओ साेशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता. आता हाच व्हिडीओचा लिलाव करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या या व्हिडीओच्या लिलावाची आधारभूत किंमत ४६ लाख रुपये इतकी ठेवली आहे.

२००८ मध्ये पाकिस्तानच्या कराची रेल्वे स्थानकावर चांद नवाब यांनी रिपोर्टींग केले होले. ईद निमित्त केलेला त्यांचा रिपोर्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला होता. आणि रातोरात ते स्टार बनले होते. रिपोर्टिंग करत असताना येणारे व्यत्यय आणि त्यांची उडालेली भंबेरीसुद्धा या कॅमेऱ्यात कैद झाली होती. आणि हाच व्हिडिओ नेटिझन्सनं उचलून धरला होता. चांद नवाब हे रेल्वे स्थानकावरील जिन्यावर उभं राहून चित्रीकरण करत होते. आणि प्रवासी त्यांच्या मागून येत कॅमेरासमोर येत असल्यानं त्यांना व्यत्यय येत होता. याचं संदर्भातील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, बॉलिवूड कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी यांन ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात चांद नवाब यांची भूमिका साकारली आणि अगदी हुबेहुब सीन चित्रपटात दिला होता. दरम्यान, चांद नवाब यांनी याच व्हिडीओचा लिलाव करण्याचे जाहिर केले आहे. त्यासाठी आधारभूत किंमत जवळपास ४६ लाख ७४ हजार ७०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. डिजिटल संपत्तीची विक्री केली जाणाऱ्या एनएफटी प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओची विक्री केली जाणार आहे.

यासंदर्भात बोलताना चांद नवाब म्हणाले की, २००८ साली ईदच्या निमित्तानं रेल्वे स्टेशनवर मी जे
रिपोर्टिंग केलं होतं. त्यात प्रवासी वारंवार कॅमेरासमोर येऊन रिपोर्टिंग मध्ये व्यत्यय आणत होते. मला
एकच वाक्य वांरवार शूट करावं लागत होतं आणि याचाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ आता लिलावात काढण्याचा निर्णय घेतला असल्याच त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Pune Rural Police | महिला पोलिसांना 8 तास ड्युटी ! पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. देशमुख यांचा ‘अभिनव’ उपक्रम

Pari Paswan | ‘कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून अश्लिल चित्रफीत तयार केली; ‘या’ मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  chand nawab pakistani reporter viral video auction nawazuddin siddiqui played role bajrangi bhaijaan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update