चंदा कोचर यांच्या अडचणीत प्रचंड वाढ ; ED कडून सन्मस जारी, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आयसीआयसीआय आणि विडिओकाॅनशी संंबंधित चौकशी करणाऱ्या ईडीने आधिक तपास सुरु करत बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना पुढील आठवड्यात ईडी समोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, चंदा कोचर यांनी 10 जूनला या प्रकरणाची ग्वाही देण्यास सांगण्यात आले होते. या आधी त्यांना मागील गुरुवारीच उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला होता, परंतू त्या तारखेला येण्यास त्यांनी नकार दिला होता.

ईडी मागील महिन्यात चंदा कोचर आणि त्यांने पती दिपक कोचर यांनी बऱ्याच वेळा चौकशी केली आहे. आणि त्या संबंधित त्यांचे म्हणणे देखील नोंदवून घेतले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशी संस्था आणि बँक अधिकाऱ्यांना बोलावून त्याची चौकशी करणे आणि चंदा कोचर यांनी दिलेल्या माहितीची सत्यता तपासण्याचा आधिकार आहे. एजेंन्सी या प्रकरणाला स्पष्ट पद्धतीने समजून घेण्यास इच्छूक आहे.

काय आहे कर्ज देण्यात आलेले प्रकरण
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3250 कोटीचे कर्ज दिले होते. हे कर्ज नियमानुसार न देण्यात आल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. प्रकरण समोर आल्यावर याची तपासणी न्यायाधीस श्रीकृष्ण समितीकडे सोपवण्यात आली होती, ज्यात व्हिडिओकॉन समूहाला नियमबाह्य पद्धतीने कर्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हे कर्ज व्हिडिओकॉन समूहाला देण्यात आले. त्यावेळी आयसीआयसीआय बँकच्या चंदा कोचर या सीईओ होत्या. व्हिडिओकॉन ही त्याचे पती दिपक कोचर यांची कंपनी आहे. आता पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावण्यात आल्यानंतर चंदा कोचर हे ईडी समोर हजर राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल , कारण मागील वेळी त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यात नकार कळवला होता. जर चंदा कोचर ईडी समोर उपस्थित राहील्या नाही, तर ईडी काय करवाई करणार हे ही यावरच अवलंबून असेल.