Chandan Benefits | चेहर्‍यावर अशाप्रकारे लावा चंदन, दूर होतील ‘या’ 4 समस्या; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chandan Benefits | कडाक्याच्या थंडीनंतर आता उन्हाळा आला आहे. उष्ण हवा (Hot Air), घाम (Sweat) आणि प्रदूषणामुळे (Pollution) त्वचेशी संबंधित समस्या (Skin Problems) या ऋतूत काहीशा वाढतात. त्यामुळेच या ऋतूमध्ये थंडीपेक्षा त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. या दरम्यान, त्वचेसाठी कोरफड जेल (Aloe Vera Gel), चंदन (Sandalwood), मुलतानी माती (Multani Soil), बर्फ (Ice) यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो. चंदन कडक उन्हात त्वचेला आराम देण्याचे काम कसे करते, ते जाणून घेवूयात (Chandan Benefits)…

 

हजारो वर्षांपासून चंदन सौंदर्यासाठी (Chandan For Beauty) उत्तम औषध मानले जाते. चंदन केवळ नैसर्गिकच नाही तर विश्वसनीय आणि प्रभावी देखील आहे. चंदन हे सुगंधी लाकूड आहे, ज्याचा आयुर्वेदात (Ayurveda) विविध उपचारांसाठी वापर केला जातो. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे (Medicinal Properties), मुरुम (Pimples), टॅनिंग (Tanning), सनबर्न (Sunburn) ते सुरकुत्या (Wrinkles) यासारख्या त्वचेशी संबंधित अनेक समस्यांसाठी याचा वापर केला (Chandan Benefits) जातो.

 

या 4 प्रकारे करा चंदनाचा वापर (Use Sandalwood In These 4 Ways)

1. कोमल त्वचेसाठी (For Soft Skin)
वर्षभरात असे काही दिवस येतात जेव्हा आपली त्वचा खूप कोमल (Soft) आणि सुंदर (Beautiful) दिसते, परंतु ती नेहमी अशीच राहावी असे सर्वांना वाटते. हवामानातील बदलाचा (Climate Change) आपल्या त्वचेवरही परिणाम होतो. जर तुमच्या त्वचेची चमक कमी झाली असेल तर मग चंदनाची मदत आवश्य घ्या. चंदनाच्या तेलाने चेहर्‍याला मसाज करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.

2. सन टॅनसाठी (For Sun Tan)
उन्हाळ्यात सन टॅनिंग (Sun Tan) किंवा सन बर्न ही एक सामान्य समस्या आहे.
मात्र, चंदन पॅक (Chandan Pack) या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतो.
यासाठी काकडीच्या रसामध्ये (Cucumber Juice) एक चमचा दही (Curd), एक चमचा मध (Honey),
काही थेंब लिंबाचा रस आणि एक चमचा चंदन पावडर मिसळा.
आता ही पेस्ट चेहर्‍यावर किंवा हातावर मास्क म्हणून लावा. ते कोरडे झाल्यावर धुवून टाका.
याच्या मदतीने चेहर्‍यावरील काळे डाग आणि सनटॅन बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते.

 

3. डार्क सर्कलसाठी (For Dark Circles)
जर तुम्ही डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असाल तर एक चमचा चंदन पावडर आणि खोबरेल तेल (Coconut Oil) मिसळून पेस्ट बनवा
आणि त्याने डोळ्यांना मसाज करा, याच्या रोजच्या वापराने ही समस्या दूर होऊ शकते.

 

4. तेलकट त्वचेसाठी (For Oily Skin)
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यासाठी चंदन पावडरमध्ये गुलाबपाण्याचे (Rose Water) काही थेंब मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा.
काही वेळ चेहर्‍यावर ठेवा, कोरडे झाल्यावर धुवून टाका. याच्या मदतीने तेलकट त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Chandan Benefits | sandalwood chandan powder can help all skin related problems know 4 ways to use it

 

#सौंदर्य टिप्स #उन्हाळ्यात त्वचेची काळजी #चंदनाचे फायदे #चंदनाचा वापर #Lifestyle #Fashion Beauty #Beauty Tips #Beautiful Skin #Flawless Skin #Summer Care Tips #Sandalwood Benefits #Chandan Power Benefits #Chandan For Skin # Lifestyle And Relationship

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास उपयोगी ठरू शकतात ‘ही’ होमिओपॅथी औषधे, घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; जाणून घ्या

 

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरुंना मोठा दिलासा, भाडे न भरणे हा गुन्हा नाही

 

Pune Crime | 45 वर्षीय ‘चाचा’कडून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार