Chandan Nagar Pune Crime News | पुणे : लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार, फोटो व्हायरलची धमकी; गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandan Nagar Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) महिलेवर बलात्कार केला (Rape Case Pune) . त्यानंतर शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवताना काढलेले महिलेचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते 10 जून 2024 या कालावधीत पुण्यातील वेगवेगळ्या भागात घडला आहे.(Chandan Nagar Pune Crime News)

याबाबत एका 40 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी विपुल राम आडे Vipul Ram Aade (वय-35, रा. आनंद पार्क, गणेशनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध आयपीसी 376, 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढे याची चार वर्षांपूर्वी महिलेशी ओळख झाली होती. महिलेला त्याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्याने महिलेची छायाचित्रे मोबाइलमध्ये काढली होती. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने महिलेला मारहाण करुन फोटो समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. आढेच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी