Chandan Nagar Pune Crime | पुणे : हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandan Nagar Pune Crime | पुण्यातील चंदननगर परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केला. (Molestation Case) तसेच पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. हा प्रकार मार्च 2023 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) हॉस्पिटल मध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेने शनिवारी (दि.13) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अजय जाधव (वय-34 रा. मुळशी जि. पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(अ), 506, 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे (PSI Dilip Palve) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पूर्वी एकाच हॉस्पिटलमध्ये कामाला होते. फिर्यादी महिला हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती.
तर आरोपी मॅनेजर म्हणून काम करत होता.
हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आरोपी अजय जाधव याने फिर्यादी व त्यांच्या
सहकारी महिलेला अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

तसेच अश्लील बोलून, अश्लील हावभाव व हातवारे करुन फिर्यादी व त्यांच्या सहकर्मी महिलेच्या मनास लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन केले.
दरम्यान, अजय जाधव याने फिर्यादी यांच्या मोबाईलवर मध्यरात्री मॅसेज करुन त्रास देऊ लागला.
तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी अजय जाधव याने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आरोपीच्या त्रासाल कंटाळून महिलेने चंदननगर पोलिसांकडे जाधव विरोधात तक्रार दिली.
पुढील तपास पीएसआय दिलीप पालवे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त