Chandani Chowk bridge Demolished In Pune Maharashtra | स्फोटासाठी वापरले 1 हजार 350 डिटोनेटर तरीही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे पडला नाही, ‘पोलीसनामा’च्या FBLive नंतर अधिकार्‍यांनी सांगितले कारण… (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandani Chowk bridge demolished in Pune Maharashtra | पुण्यातील चांदणी चौक येथील पूल काल मध्यरात्री एक वाजता 1 हजार 350 डिटोनेटरचा वापर करून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तरीही कंपनीने दावा केल्याप्रमाणे पूल पूर्णपणे कोसळला नाही. याबाबत ‘पोलीसनामा’ने FBLive केल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांची यावर स्पष्टीकरण देण्यासाठी धावपळ उडाली होती. प्रशासनाचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी यांच्या स्पष्टीकरणात विसंगती दिसून येत आहे. शिवाय, पूल का पडला नाही याबाबत सांगितलेली कारणे न पटणारी आहेत. (Chandani Chowk bridge Demolished In Pune Maharashtra)

 

दिल्लीतील ट्विटन टॉवर ही इमारत 12 सेकंदात पाडणारी कंपनी ईडीफाईसलाच हे काम देण्यात आले होते. काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट करण्यात आला. मात्र, संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे एनएचएआय (NHAI) आणि जिल्हा प्रशासनाचे नियोजन अपयशी ठरल्याची टीका होत आहे.

 

पूल पाडण्याचा प्रयत्न फसल्याने सोशल मीडियावर मीम्सद्वारे टीका होत आहे. 1 हजार 350 डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही यावर अधिकारी आनंद शर्मा यांनी सारवासारव करणारी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्यावेळी हा पूल बांधण्यात आला त्यावेळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्फोटानंतर पुलाचा काही भाग शिल्लक राहिला. (Chandani Chowk bridge Demolished In Pune Maharashtra)

 

 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) म्हणाले, चांदणी चौकातील पूल 1 वाजून 7 मिनिटांनी स्फोट घडवून पाडला. मात्र पूल बांधताना जास्त स्टील वापरलेले असल्याने पुलाचा राडारोडा बाजूला करण्यास वेळ गेला आहे. आम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी मार्ग खुला होईल. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेता 10 वाजेपर्यंत रस्ता खुला होईल.

 

एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर उत्कर्ष मेहता म्हणाले होते, रात्री 2 वाजून 33 मिनिटांनी चांदणी चौकातील संपूर्ण पूल पाडण्यात आला. आम्ही 100 टक्के पूल पाडण्यात यशस्वी झालो आहोत. आम्हाला पूल पाडण्यात ब्लास्टचा फायदा झाला आहे. तसेच आता राडारोडा काढण्याच काम सुरू आहे. सकाळी 8 च्या पूर्वी आमचे काम पूर्ण होईल.

 

चांदणी चौकातील पूल पाडण्याआधी अशी केली प्रशासनाने तयारी

– सायंकाळी 6 वाजल्यापासून पूल परिसरातील 200 मीटर परिसर निर्मनुष्य केला.

– परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते.

– रात्री 11 नंतर वाहतुकीसाठी रस्ता बंद केला.

– तुकडे अथवा धूळ उडू नये म्हणून पुलाचे दोन्ही भाग भल्या मोठ्या पांढर्‍या पडद्याने झाकला.

– रात्री 1 वाजता स्फोट झाला आणि अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला.

– संपूर्ण पूल सहा सेकंदात जमीनदोस्त करण्याचा कंपनी आणि प्रशासनाचा दावा फोल ठरला.

– पूल न पडल्याने पोकलेनच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पाडण्यात आला. त्यात वेळ गेल्याने सकाळी 8 वाजता वाहतूक पूर्ववत करण्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे नियोजनही कोलमडले.

– यामुळे रविवारी सकाळी दोन्ही बाजूने तब्बल 10 किलोमीटरपर्यंत जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

– सकाळी 10 नंतर मुंबई-बंगळुरू मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.

 

Web Title :- Chandani Chowk bridge Demolished In Pune Maharashtra |
why chandani chowk bridge not demolish completely after blast in pune know in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा