नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात देशभरात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत असून यामध्ये महाराष्ट्राबरोबरच हरियाणामध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि मायावती यांचा बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष हि विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार आहेत.
भाजपला या निवडणुकीत टक्कर देण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. यासाठी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा यांनी मायावती यांच्याशी चर्चा देखील केली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रचार समितीचे प्रमुख भूपिंदर सिंह हुड्डा यांनी देखील मायावती यांच्याशी चर्चा केली.
हरियाणामध्ये बीएसपीची दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीशी युती होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी या पक्षाशी असणारी युती तोडली. त्यानंतर मायावतींनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते कि, बसपा हा राष्ट्रीय पक्ष असून जागावाटपात त्यांची भूमिका चुकीची असल्याने आम्ही युती तोडण्याचा निर्णय घेतला.
काही महिन्यांपूर्वीच आयएनएलडी बरोबर होती बसपा
लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बसपाने आयएनएलडी बरोबर आघाडी केली होती. त्याचबरोबर त्यांनी हरियाणामध्ये अनेक स्थानिक पक्षांबरोबर युती आघाडी केली होती. मात्र आता त्यानंतर मायावती काँग्रेसबरोबर हात मिळवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
दलितांची मते वळविण्याचा प्रयत्न
भाजपसाठी दलित मते हे मोठा चिंतेचा विषय आहे. काँग्रेसने नुकतेच कुमारी शैलजा यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची कमान सोपवली आहे. त्यामुळे मायावती यांच्याबरोबर हातमिळवणी करून दलित मते आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे.
- वजन कमी करण्यासाठी सकाळी करा ‘ही’ ४ कामे, जीमला जाण्याची गरज नाही
- चेहऱ्यावर जखमेचे व्रण आहेत का ? ट्राय करून पाहा ‘हे’ 6 सोपे उपाय
- काही दिवसांत वाढेल ‘रोगप्रतिकारक शक्ती’, जाणून घ्या कोणते ५ पदार्थ खावेत
- एक ग्लास दूध प्या आणि मधूमेहाचा धोका कमी करा, होतात ‘हे’ १० फायदे
- यासोबत खा अंडे, होईल दुप्पट फायदा, जाणून घ्या ‘हे’ खास पदार्थ कोणते
- सावधान ! तुम्ही लेग क्रॉस करून बसता का? होऊ शकते ‘या’ ५ प्रकारचे नुकसान
- ‘या’ ७ आजारांमुळे होऊ शकते बद्धकोष्ठता, योग्यवेळी करा उपचार
- महिलांच्या तुलनेत ‘हे’ ६ आजार पुरूषांना होण्याची जास्त शक्यता, जाणून घ्या
- ‘स्मोकिंग’संबंधी खोट्या आहेत ‘या’ ५ गोष्टी, जाणून घ्या काय आहे सत्य
- सशक्त केस कसे ओळखावेत माहित आहे का ? जाणून घ्या याचे ७ संकेत
- ‘हा’ चहा जास्त पिणे किडनीसाठी आहे धोकादायक! ‘या’ १० चुका जाणून घ्या
- कमी केलेले वजन नियत्रंणात ठेवणेही अवघड, फॉलो करा ‘या’ टीप्स
- मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ज्येष्ठांनी अवश्य करावे ‘हे’ एक काम, जाणून घ्या
- ‘डिप्रेशन’ दुर करण्यासाठी अशी घ्या काळजी, अति तणावाची कारणे
- घरातच उपलब्ध असलेल्या ‘या’ १५ पदार्थांनी धुवा केस, शाम्पू जाल विसरून