आई-वडिलांचा स्पष्ट नकार असतानादेखील सुषमा स्वराज यांनी केला ‘प्रेमविवाह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि धाडसी राजकारणी म्हणून त्या परिचित होत्या. सुषमा स्वराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पुर्णवेळ परराष्ट्र मंत्री राहिल्या. काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले, मात्र काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय नम्र आणि सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये लोकप्रिय असलेला हा चेहरा भारतातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहील.

सुषमा स्वराज या कणखर आणि दृढ मनाच्या राजकारणी असल्या तरी त्यांनी प्रेमविवाह केला होता. ज्या काळात महिलांना पुढे येण्यास किंवा सामाजिक क्षेत्रात कमी संधी उपलब्ध असताना त्यांनी त्या काळी प्रेमविवाह केला होता. स्वराज कौशल असे त्यांच्या पतीचे नाव असून त्यांना या विवाहासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्या यामध्ये मागे हटल्या नाहीत. दोघांच्याही घरच्यांचा या लग्नासाठी विरोध होता, मात्र सुषमा यांनी घरच्यांची समजूत काढत अखेर प्रेमविवाह केलाच.

कॉलेजमध्ये सुरु झाली लव्ह स्टोरी

पंजाब विद्यापीठ चंदीगडपासून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्या ठिकाणी ते एकमेकांना भेटले. त्या ठिकाणी त्यांनी एकमेकांना पहिले आणि त्यांच्यात प्रेमकहाणीला सुरुवात झाली. अखेर १३ जुलै १९७५ रोजी त्यांनी विवाह केला. त्यांचे पती स्वराज कौशल हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रसिद्ध वकिल होते. त्याचबरोबर त्यांनी मिझोरामचे राज्यपाल म्हणून काम देखील केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –