दुर्देवी ! तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यानं अभिनेता रंजन सहगल यांचे 36 व्या वर्षी निधन

जीरकपूर/ पंजाब : वृत्तसंस्था – बॉलिवूडसाठी हे वर्ष अतिशय दु:खद वर्ष ठरलं आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी (दि.11) बॉलिवूड अभिनेता रंजन सहगल यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या केवळ 36 व्या वर्षी रंजन यांनी जगाचा निरोप घेतला. मल्टिपल ऑर्गन फेलियरमुळे त्यांचे निधन झाले. रंजन हे पंजाबमधील जीरकपूर येथे होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना चंदीगड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. व्हेंटिलेटरची डिमांड करण्यात आली होती. मात्र, तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

रंजन हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. मुंबईत एकटेच रहात असल्याने त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. गावी परतल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

रंजयन यांच्या निधनाने बॉलिवूड व पंजाबी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रंजन यांनी टीव्हीशिवाय बॉलिवूड व पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत काम केले. रंगभूमिपासून त्यांनी आपल्या करीअरची सुरुवात केली. त्यांनी क्राईम पेट्रोल, रिश्तों से बडी प्रथा, सावधान इंडिया अशा अनेक मालिकांमधे काम केले होते. तसेच शाहरुख खानचा ‘झिरो’ आणि रणदीप हुड्डासोबत ‘सरबजीत’ या सिनेमातही ते झळकले होते.

रंजन हे शाळेत शिकत असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी पार्ट टाईम नोकरी करुन आपले शिक्षण पूर्ण केले. याच दिवसांत त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी नव्या छाब्रासोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचा घटस्फोट झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like