कॉल गर्ल म्हणून YouTube वर शेअर केला तरुणीचा नंबर अन् …

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाइन – एका तरूणीचा नंबर तिच्याच शेजारी राहणाऱ्या एका मुलानं कॉलगर्ल (Call Girl) असं लिहून युट्युबवर (YouTube) अपलोड केल्याचा प्रकार पंजाबच्या (Punjab) मोगा जिल्ह्यातून समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला आहे. आरोपी गगदीप सध्या कॅनडात स्थायिक आहे.

पीडित तरूणीचा नंबर युट्युबवर गेल्यानंतर तिला कॉल येऊ लागले. काही लोक तर तिला अश्लील प्रश्नही विचारू लागले. यामुळं ती तरुणी नैराश्येत गेली. तिच्यावर अखेर उपचार करण्याची वेळ आली. सदर मुलीनं मोहाली सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली. प्रदीर्घ तपास केल्यानंतर मोगा येथील सायबर क्राईमनं गगदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गगदीप हा पीडित तरुणीच्या शेजारीच रहात असल्याचं तिनं सांगितलं आहे. तो तिच्यासोबत दहावीत होता. तो तिचा पाठलाग करायचा. शेजारीच असल्यामुळं तिनं अनेकदा त्याची तक्रारही केली. परंतु त्यांनीही याकडे लक्ष दिलं नाही आणि मस्करी करू लागले. काही वर्षांनी गगदीप कॅनडाला गेला आणि तिथं गेल्यानंतरही तो पीडित तरुणीला त्रास देत राहिला.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा
या प्रकरणात मोगा सायबर क्राईमचे डीएसपी सुखविंदर यांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवरून कारवाई केल्यांतर गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत सोशल मीडियावर लोकांना अपील करण्यात आली आहे की, कोणत्याही माहितीशिवाय असलेली फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नये.