आई अन् बहिणीनं शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा तर 3 महिन्याच्या मुलीनं दिली ‘मुखाग्नी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले गुरुदारपूरच्या लाल रंजीत सिंह सलारिया यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत गुरुवारी सन्मानात अंतिम निरोप देण्यात आला. रंजीत सिंह 13 जानेवारीला जम्मू काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. ते 12 हजार फुट उंचीवर – 30 डिग्रीच्या तापमानात गस्तीवर होते, तेव्हा अचानक हिमस्खलन झाले, ज्यात त्यांचा बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे मृत्यू झाला.

शहीद झाल्यानंतर चार दिवसांनी रंजीत या जवानाच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी श्रीनगरहून विशेष विमानाने अमृतसहच्या राजासांसी एअरपोर्ट अमृतसरवर आणण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव सिद्धपूर येथे आणण्यात आले, तेव्हा जॅक रायफल्सच्या जवानांनी शहीद जवानाला सलामी दिली.

पत्नीला आवरता आले नाही अश्रू –
तिरंगाने झाकलेले जवानाचे पार्थिव जेव्हा गावात आणले गेले. ते पाहताच आई रीना देवी, वडील हरबंस सिंह, पत्नी दीया, बहीन जीवन ज्योती यांना धक्का बसला. आपल्या शहीद पतीला पाहून दीया यांना रडू कोसळले. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले की माझ्या रंजीतला पेटीतून बाहेर काढा त्यांना गुदमरेल. माझ्या परीला तिच्या वडीलांना पाहायचे आहे, बघ परी बाबा आले. येवढे बोलून त्या बेशुद्ध झाल्या.

आई अन् बहीणीने दिला रंजीत यांच्या पार्थिवाला खांदा –
शहीद जवान रंजीत यांच्या आई आणि बहीणीने पार्थिवाला खांदा दिला. त्या शहीद रंजीत यांचे पार्थिव घेऊन शमशान घाटावर पोहचल्या. यावेळी गावातील सर्व तरुणांनी रस्त्यावरुन जवानाचे पार्थिव जाताना रस्त्यावर फुलांचा मार्ग केला होता.

शहीद जवान रंजीत सलारिया हे ऑक्टोबरमध्ये आपल्या मुलीच्या सानवीच्या वाढदिवशी आले होते, त्यांनी मुलीचे नाव परी ठेवले होते. आता याच लहानग्या मुलीच्या हाताने शहीद वडीलांच्या चितेला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी भारत माता की जय चे नारे देण्यात आले.

प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. यावेळी डीसी विपुल उज्जवल यांनी सैन्य अधिकाऱ्यांबरोबर शहीद कुटूंबाला तिरंगा भेट देऊन म्हणाले की जवान रंजीत देशासाठी शहीद झाल्याने कुटूंबाचा सहारा गेला, त्यांच्या शहीद झाल्याने सरकारच्या धोरणानुसार त्यांच्या पत्नीला शैक्षणिक पात्रतेनुसार नौकरी देण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/