home page top 1

सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या शरीरावर खुना नसल्यानं हायकोर्ट म्हणालं – ‘तिच्या सहमतीनं झालं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामुहिक बलात्कारानंतर मुलीच्या शरीरावर काहीच जखमा नव्हत्या. त्यामुळे अशा कृत्यासाठी मुलीची संमती होती, असा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. एका सामुहिक बलात्काराप्रकरणी चंदिगड प्रशासनाने 2015 मधील एका आरोपी विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

शरीरावर जखमा नाहीत म्हणजे मुलीची परवानगी होती
पीडितेच्या वडिलांनी या विरोधात तक्रार दाखल केली होती. 30 ऑक्टोबर 2015 च्या रात्री मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अमित, सूरज, कन्नू आणि विकास या चार आरोपींची तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता.

मात्र खंडपीठाने सांगितले की, आमचे हे म्हणणे आहे की पीडित मुलीचे अपहरण झालेले नाही. तसेच आरोपींबाबत जे सांगितले जातंय तेही खरे वाटत नसल्याचे खंडपीठाने सांगितले. तसेच न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की मुलीच्या शरीरावर कोणत्याच जखमा नाहीत म्हणजे शारीरिक संबंध हे तिच्या सहमतीने झालेले आहेत.

गुन्हा दाखल करताना मुलीचे वय 18 वर्ष होते
न्यायालयाने सांगितले की, पीडितेने केलेल्या तक्रारींवर पीडित मुलगी सोडून इतर काही सबळ पुरावा नसल्याने तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवणे शक्य नसल्याने याचा निर्णय आरोपींच्या बाजूने दिला जातोय.

यातील अमित नावाच्या तरुणाने हे सांगितले की, ती मुलगी आणि तो दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि यामध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला फसवून तक्रार दाखल केली आहे. 2017 मधेच या मुलांना न्यायालयाने आरोपमुक्त केले होते.

या आधी देखील फेटाळली होती याचिका
उच्च न्यायालयाने 2018 मध्ये अमित सहित अन्य तीन आरोपींच्या विरोधातील ही याचिका फेटाळली होती. यावेळी मुलीचे अपहरण झाले असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.

Visit  :Policenama.com

 

Loading...
You might also like