पाकिस्तानमधून ‘ड्रोन’व्दारे अंमली पदार्थ आणि हत्यारांच्या ‘तस्करी’चा पर्दाफाश, सेनेच्या जवानासह तिघे अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब पोलिसांनी ड्रोनद्वारे अमृतसर आणि हरियाणाच्या करनालमध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत भारतीय सैन्याचा एक जवान आणि त्याच्यासह 3 जणांना ताब्यात घेतले आहे. पंजाबचे पोलीस महानिदेशक दिनकर गुप्ता यांनी सांगितले की, चीनी बनावटीचे दोन ड्रोन, 12 बॅटरी, परदेशात तयार करण्यात आलेले ड्रोनचे कंटेनर, रायफलची काडतूसं, दोन वॉकी – टॉकी सेट आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ससह 6 लाख 22 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांनी खुलासा केला की, पाकिस्तान सीमेपलीकडून ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये ड्रग्स आणि शस्त्र पाठवण्यात येत होती.

सैन्याचा जवान ताब्यात –
डीजीपी दिनकर गुप्ता म्हणाले की, कारवाईदरम्यान दोन ड्रोन जप्त करण्यात आले. यातील एक ड्रोन अमृतसरच्या एका गावातून तर एक ड्रोन हरियाणाच्या करनालामधून जप्त करण्यात आले. ते म्हणाले की ज्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यात नायक राहुल चौहान नावाच्या आरोपीचा समावेश आहे. ते म्हणाले की ड्रोनशिवाय दोन कम्युनिकेशनल सेट आणि 6 लाख 22 हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यांची शंका आहे की रक्कम तस्करी करुन विक्रीतून जमा करण्यात आली आहे.

तस्करी डीजीपीने सांगितले की, ते ड्रोन भारतातून पाकिस्तानात पाठवत असत आणि तेथून अंमली पदार्थ तस्करी करुन देशात आणले जात होते. त्यांनी शंका व्यक्त केली की अंमली पदार्थांबरोबर पिस्तुलसारखे शस्त्रांची देखील तस्करी होत होती. ते म्हणाले की पहिला ड्रोन अमृतसरच्या मोधे गावातून सरकारी डिस्पेंसरीमधून जप्त करण्यात आला त दुसरा ड्रोन आरोपी राहुल चौहानच्या मित्राच्या हरियाणातील घरातून जप्त करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/