मुख्याध्यापकाचे मास्तरीन सोबत ‘झेंगाट’ करतानाचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था- पंजाब मध्ये एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेशी अश्लील कृत्य केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे शिक्षण विभागाची लाज वेशीवर टांगली गेली आहे. या व्हिडीओ मध्ये शाळेचा मुख्याध्यापक आपल्या शाळेतील दोन महिला शिक्षिकांसोबतअश्लील हरकती करत असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओवर मुख्याध्यापक म्हणाले हा व्हिडीओ बनावट आहे.

हा संतापजनक प्रकार पंजाब मधील होशियारपूर जिल्ह्यात एका सरकारी शाळेत घडला घडला आहे. आरोपी मुख्याध्यापकाचे दोन व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. हे दोन्ही व्हिडीओ वेगवेगळ्या दिवसाचे आहेत. व्हिडीओ मध्ये शाळेचे मुख्याध्यापक दोन महिला शिक्षकांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे दिसत आहे. महिला शिक्षिका कार्यालयात प्रवेश करते आणि दोघं एकमेकांच्या गळ्याला पडतात. आणि मग सुरु होतात अश्लील हरकती. त्यानंतर दोघंही एकमेकांपासून दूर होतात. व्हिडीओ मध्ये असेही दिसत आहे की, आरोपी आणि महिला शिक्षिका काहीतरी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर दोघंही पुन्हा एकूण मेकांच्या गळ्याला पडतात.

तर दुसर्‍या एका व्हिडिओ क्लिपमध्ये, एक दुसरी महिला शिक्षिका आरोपीच्या उजवीकडे बसलेली दिसून येत आहे आणि स्वाक्षरीसाठी एक रजिस्टर पुढे देत आहे. आरोपी मुख्याध्यापक कोणाशीतरी फोनवर बोलत आहे. मधेच आरोपी त्या महिलेचे तिच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे.

मुख्याध्यापकाने सर्व आरोप नाकारले 
असे सांगितले जात आहे की, शाळेतील मुख्याध्यापकाचे महिला शिक्षिकेशी सुरु असलेल्या अश्लील प्रकारामुळे काही शिक्षक त्रस्त होते. म्हणूनच शाळेच्या एका कर्मचाऱ्याने मुख्याध्यापकांच्या अश्लील कृत्याचा पुरावा गोळा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात एक गुप्त कॅमेरा बसवला होता. पण मुख्याध्यापकांनी आपल्यावर केले जात असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, काही खोडकर लोकांनी माझी प्रतिमा डागाळण्यासाठीच हे बनावट व्हिडीओ तयार केले आहेत.

सरपंचांनी मुख्याध्यापकाची बदली करण्यास सांगितले 
गावचे सरपंच प्रभात हैप्पी म्हणाले की, मी आणखी हा व्हिडीओ बघितला नाहीये. परंतु हा प्रकार माझ्या ऐकण्यात आला आहे. त्यांनी मुख्याध्यापकाची बदली करून त्याला दुसऱ्या शाळेत पाठवण्यास सांगितले. बोलताना ते म्हणाले की, याच्या आधीही गावातील सरकारी शाळेच्या एका शिक्षकाबाबत असाच एक प्रकार गावात घडला होता तेव्हा सुद्धा आम्ही त्याला गाव सोडून जाण्यास सांगितले होते.

आरोग्यविषयक वृत्त –