पंजाबमध्ये कीर्तनाच्या दरम्यान मोठा स्फोट, 2 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पंजाबच्या तरण तारणमध्ये एका शहर कीर्तनाच्या दरम्यान शनिवारी अचानकपणे मोठा स्फोट झाला आहे. त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. फटाक्यांनी भरलेल्या ट्रकचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्फोटामुळं गंभीर जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. मयतांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाबा दीप सिंह यांच्या जन्मदिवसा निमित्त नगर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच वेळी ही भयानक घटना घडली आहे. घटनेनंतर कीर्तनामध्ये अफरा-तफरी उडाली. मृत्यू झालेल्यांमध्ये जास्त करून मुलांचा समावेश आहे.