राजीनाम्यानंतर सिद्धू यांना ‘या’ पक्षाची ऑफर, २०२२ मध्ये बनवणार मुख्यमंत्री !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब सरकारमध्ये मंत्री राहिलेले काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांना पंजाबमधील एका पक्षाने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. लोक इंसाफ पार्टी (लोकपा) चे अध्यक्ष सिमरजीत सिंह बैंस यांनी सिद्धू यांच्या राजीनामा नाट्यावर बोलताना म्हटले की, ईमानदार लोकांचा काँग्रेसमध्ये जीव गुदमरतो. इथे ईमानदार लोकांची कदर नाही. त्याचबरोबर त्यांनी सिद्धू यांना आपल्या पक्षात प्रवेश करण्याचे आमंत्रण देखील दिले. सिद्धू यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करून पक्ष निवडणूक लढवेल असे देखील जाहीर केले.

ईमानदार लोकांचा काँग्रेसमध्ये जीव गुदमरतो

सिद्धू यांच्या राजीनामा नाट्यावर बोलताना त्यांनी म्हटले कि, सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर हे सिद्ध होत आहे की, ईमानदार लोकांचा काँग्रेसमध्ये जीव गुदमरतो. त्याचबरोबर मी सिद्धू यांच्या राजीनाम्याला अर्धवटच मानतो. त्यांनी पक्षाचा देखील राजीनामा द्यायला हवा. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, एका बाजूला वाळू चोरी करणाऱ्या मंत्री राणा गुरजीत सिंह यांचा राजीनामा मोठ्या कष्टाने घेतला. तर दुसऱ्या बाजूला चोरांना पकडणाऱ्या इमानदार सिद्धू यांना राजीनामा द्यावा लागला.

करतारपुर कॉरिडोरवर राजकारण नको

सिमरजीत यांनी या विषयावर बोलताना काँग्रेस, अकाली दल आणि भाजपला राजकारण न करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता काँग्रेसचा राजीनामा देऊन सिद्धू कोणत्या नवीन पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी