ज्योतिष : ‘गुरुपौर्णिमे’च्या दिवशीच असणार चंद्र ‘ग्रहण’, ‘या’ ७ राशींवर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुलै महिन्यात १६ ते १७ तारखेला चंद्र ग्रहण असणार आहे. हे चंद्र ग्रहण खंडग्रास चंद्र ग्रहण असणार आहे. याचा कालवधी २ तास ५९ मिनिटे असणार आहे. देशात हे चंद्र ग्रहण १६-१७ जुलैला रात्री १.३१ मिनिटांनी सुरु होईल. तर ४.३० मिनिटांपर्यंत चालेल. चंद्र ग्रहणात ग्रहण सुरु होण्याआधी ९ तासआधी सूतक लागेल.

गुरुपौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकाच दिवशी
यंदा चंद्र ग्रहण आणि गुरुपौर्णिमा पर्व एकाच दिवशी येणार आहे. गुरुपौर्णिमेला असलेले हे लागोपाठ दुसरे चंद्र ग्रहण असेल. या आधी २७ जुलैला गुरुपौर्णिमेला खग्रास चंद्र ग्रहण होते. या ग्रहणाचा कालावधी ३ तास ५१ मिनिट होता मात्र यंदाच्या ग्रहणाचा कालावधी २ तास ५९ मिनिट असणार आहे. गुरु पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकत्र असल्याने गुरु पौर्णिमाचा गुरु पूजा हा कार्यक्रम सूतक लागण्याआधी पूर्ण करावा.

खग्रास चंद्र ग्रहणाचा योग-१६ जुलै
पंचांगानुसार ग्रहण काळात चंद्रमा धनु राशीत असेल. शनि आणि केतू आधीपासूनच धनु राशीत आहे. चंद्रमावेळी होणारी त्रिग्रही युती मुळे वातावरणात वेगाने बदल होतील.

चंद्र ग्रहणाचा या राशींवर होणारा परिणाम
मेष – यश आणि सम्मान मिळेल.
वृषभ – आरोग्याशी संबंधित समस्या येतील.
मिथून – मानसिक ताण वाढेल.
कर्क – आर्थिक फायदा होईल.
सिंह – कुटूंबाची काळजी लागून राहिलं.
कन्या – आर्थिक नुकसानाची शक्यता
तुळ – साधारण दिवस असेल.
वृश्चिक – मानाला धक्का लागेल. कामात बाधा येतील.
धनू – जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होऊ शकतो.
मकर – शत्रूची भीती असेल.
कुंभ – यश आणि लाभ होईल.
मीन – कुटूंबात सुख समृद्धी येईल.

आरोग्यविषयक बातम्या

 

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात
दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा
लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा
अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे