Chandra Grahan 2020 : वर्षातील अखेरचे चंद्रगहण लागतंय, जाणून घ्या भारतात काय होईल परिणाम ?

पोलीसनामा ऑनलाइन – वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण 30 नोव्हेंबरला आहे. विशेष बाब ही आहे की, हे चंद्र ग्रहण यावेळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. हे चंद्र ग्रहण एक उपछाया ग्रहण असेल. ते चंद्र ग्रहण कुठे कुठे दिसेल आणि भारतात याचा काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात…

चंद्र ग्रहणाची वेळ
30 नोव्हेंबरला होत असलेले चंद्र ग्रहण दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी सुटेल. हे चंद्र ग्रहण पौर्णिमा तिथीला रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत होईल.

कुठे कुठे दिसणार
हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर आणि अमेरिकेच्या काही भागातून दिसेल. मात्र, भारतातून दिसणार नाही.

कधी लागणार सूतक
चंद्र ग्रहण सुरू होण्यापूर्वी 9 तास अगोदर सूतक लागते. मात्र, हे चंद्र ग्रहण एक उपछाया ग्रहण आहे आणि ते भारतात दिसणार नसल्याने येथे याचा सूतक काळ मान्य असणार नाही.

भारतावर याचा परिणाम
हे चंद्र ग्रहण उपछाया चंद्र ग्रहण आहे, जे भारतात दिसणार नाही. शास्त्रांमध्ये उपछाया चंद्र ग्रहणाला ग्रहण मानले जात नाही. यामुळे सूतक काळ पाळला जात नाही आणि कोणत्याही कामावर प्रतिबंधही नसेल. मात्र, नक्षत्र आणि राशीमध्ये लागणारा परिणाम जातकांवर आवश्यक पडणार आहे. हे ग्रहण वृषभ राशीत लागेल. यासाठी वृषभ राशीच्या जतकांना ग्रहण काळात अडचणींतून जावे लागू शकते.

उपछाया ग्रहण म्हणजे काय
चंद्र ग्रहण सुरू होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश करतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या प्रत्यक्ष छायेत प्रवेश न करताच बाहेर पडतो तेव्हा त्यास उपछाया ग्रहण म्हणतात. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या प्रत्यक्ष छायेत प्रवेश करतो तेव्हा त्यास पूर्ण चंद्रग्रहण मानले जाते. ज्योतिष शास्त्रात उपछाया ग्रहणाला ग्रहणाचा दर्जा दिलेला नाही.

चंद्रग्रहण म्हणजे काय
जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा सूर्याचा पूर्ण प्रकाश चंद्रावर पडत नाही. यास चंद्रग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एक सरळ रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहणाची स्थिती होते. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या रात्रीच होते. एका वर्षात कमाल तीन वेळा पृथ्वीच्या उपछायेतून चंद्र जातो, तेव्हा चंद्रग्रहण लागते.

कुठे पाहू शकता चंद्र ग्रहण
टेलिस्कोपच्या मदतीने पाहिल्यास चंद्र ग्रहणाचे सौंदर्य दिसेल. हे तुम्ही www.virtualtelescope.eu वर वर्च्युअल टेलिस्कोपच्या मदतीने पाहू शकता. याशिवाय तुम्ही हे यूट्यूब चॅनेल CosmoSapiens, Slooh वर लाईव्हसुद्धा पाहू शकता.

You might also like