Chandra Grahan 2020 : आज मध्यरात्री चंद्र ग्रहण, ‘या’ राशीवर पडणार सर्वाधिक ‘प्रभाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज 2020 सालातील पहिले चंद्र ग्रहण होणार आहे. हिंदू धर्मात या ग्रहणास अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. आज होत असलेले चंद्र ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे 11 जानेवारीला पावणेतीन वाजेपर्यंत चालेल.

यावेळचे चंद्र ग्रहण उपछाया चंद्र ग्रहण असेल. शास्त्रामध्ये उपछाया चंद्र ग्रहणाला ग्रहणरूप मानले जात नाही. यासाठी आज पौर्णिमा तिथिवर सण साजरा केला जातो. धार्मिक परंपरानुसार ग्रहणाचा चांगला अथवा वाईट प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडतो.

यावेळचे चंद्र ग्रहण एका राशीला सर्वात जास्त प्रभावित करणार आहे. चंद्र ग्रहणाचा कोणत्या राशीवर जास्त परिणाम होणार आहे हे आपण ज्योतिषतज्ज्ञ कमल नंदलाल यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

आज चंद्र ग्रहणादरम्यान चंद्र मिथुन राशीत असेल. यावेळी पूनर्वसु नक्षत्र असणार आहे. म्हणजे बुध ग्रहाच्या राशीत आणि गुरूच्या नक्षत्रात हे ग्रहण असेल.

ज्या राशीमध्ये हे ग्रहण असते, त्या राशीत आणि नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर याचा सर्वात जास्त प्रभाव पडतो.

या ग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव मिथुन राशीच्या लोकांवर पडणार आहे. या राशीच्या लोकांना ग्रहण काळात सावधानता बाळगावी लागेल. तसेच ग्रहणाच्या संबंधीत नियमांचे पालन करावे लागेल.

मिथुन राशीसह पूनर्वसु नक्षत्र असलेल्या लोकांनाही या चंद्र ग्रहणात विनाकारण समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

चंद्र ग्रहणादरम्यान देव्हार्‍यातील पारद शिवलिंगाला जलाभिषेक करा. पारद शिवलिंगाची विशेष पूजा ग्रहणाचा प्रभाव कमी करते.

हे ग्रहण बुधाच्या राशीत आणि गुरू नक्षत्रात असल्याने या दिवशी सफेद रंगाचे कपडे परिधान करा.

गरोदर महिलांनी ग्रहण काळात पारदची गोळी आपल्या गळ्यात अथवा कंबरेत सफेद धाग्यात बांधावी. यामुळे गर्भाचे रक्षण होते.

आजचे ग्रहण हे उपछाया ग्रहण आहे.सामान्य ग्रहण नाही. यामध्ये चंद्रावर केवळ सावलीची स्थिती दिसेल.

तसेच यामध्ये कोणासाठीही सूतकाचे नियम लागू होणार नाहीत. पौर्णिमेची पूजाअर्चा सुद्धा करता येईल.

हे चंद्र ग्रहण संपूर्ण जगात एकाच वेळी सुरू होते आणि एकाच वेळी समाप्त होते. परंतु, हे त्यावर आवलंबून आहे की, तेथे रात्रीची कोणती वेळ आहे. कुठे संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी अथवा त्यानंतर दिसेल. तर काही ठिकाणी सकाळी चंद्रास्ताच्या जवळपास होईल. परंतु, भारतात चंद्र ग्रहण मध्यरात्री सुरू होणार आहे. देशातील सर्व स्थानांवर हे एकाच वेळी सुरू होईल आणि एकाच वेळी समाप्त होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/