आंध्रात सुपडा साफ झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशात एकत्रित झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत टिडीपीचा सुपडा साफ झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यात लोकसभेच्या २५ जगांवर आंध्रात मतदान झाले त्यात टीडीपीला फक्त ३ जागा मिळाली आहे. जागेवर आघाडी मिळाली आहे. तर विधानसभेच्या १७५ पैकी केवळ २९ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सत्ता जातेय हे लक्षात आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी आज संध्याकाळी राजीनामा दिला.

वायएसआर कॉंग्रेसचा मोठा विजय

आंध्र प्रदेशातील निकालावरून जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने टीडीपीला क्लिन स्वीप केलं आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबू यांना सपाटून मार खावा लागल्याने त्यांचे मुख्यमंत्री पद गेले आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी पक्षाला २५ जागांवर आघाडीवर आहे. तर वायएसआर काँग्रेस १४९ जागांवर आघाडीवर आहे. तर जनसेना पार्टीला फक्त एकाच जागेवर आघाडी मिळवता आली आहे.