home page top 1

बुरे दिन ! माजी मुख्यमंत्री चंद्राबाबूंची सुरक्षा ‘घटली’, विमानतळावर चक्‍क ‘अंगझडती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एन. चंद्राबाबू नायडू यांची शुक्रवारी मध्यरात्री गन्नवरम विमानतळावर तपासणी करण्यात आली. त्यांना व्हीआयपी सुविधा नाकारण्यात आली.त्यामुळे त्यांना विमानापर्यंत सर्वसामान्य प्रवाशांसारखे बसमधून जावे लागले. त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करताना टीडीपीने भाजप आणि वायएसआर काँग्रेस सुडाचे राजकरण करत असल्याचा आरोप केला आहे.

याविषयी बोलताना माजी नेते आणि माजी गृहमंत्री चिन्ना राजप्पा यांनी म्हटले आहे कि, चंद्राबाबू नायडू यांना विमानतळावर दिलेली वागणूक ही अपमान करणारी आहे. नायडू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असताना त्यांना ही वागणूक कशी काय दिली ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. २००३ मध्ये तिरुपती येथे त्यांच्यावर माओवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हापासून त्यांना झेड प्लेस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

दरम्यान, नायडू यांना याआधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. आम्ही त्यांच्यासाठी आणखी सुरक्षा व्यवस्थेची मागणी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाकडे करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्याचबरोबर नायडू यांच्या ताफ्यातील दोन गाड्या देखील कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या

‘यकृत’ निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

Loading...
You might also like