मुख्यमंत्री कोमात ; छेडछाडीचा दावा केलेला ईव्हीएम ‘एक्स्पर्ट’ निघाला चोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करणारे टीडीपीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तोंडावर पडले आहेत. कारण ज्या एक्स्पर्टच्या हवाल्याने नायडूंनी हा आरोप केला होता तोच ईव्हीएम चोर निघाला आहे. २०१० मध्ये ईव्हीएम चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

शनिवारी चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन ईव्हीएमबाबत तक्रार केली. चंद्राबाबू नायडू यांनी हरि प्रसाद या एक्स्पर्टच्या हवाल्याने हा दावा केला होता. मात्र हरि प्रसादविषयी निवडणुक आयोगाला शंका आली. निवडणूक आयोगाने त्या व्यक्तीची चौकशी केली त्यावेळी इव्हीएममध्ये छेडछाड करता येऊ शकते असा दावा अनेक वर्षांपासून करणारी व्यक्ती हैदराबाद येथील राहणारा संशोधक हरि प्रसाद असल्याचे समोर आले. तसेच याच हरिप्रदासने आपला दावा सिद्ध करण्यासाठी परदेशी तज्ज्ञाच्या मदतीने ईव्हीएम मशीन चोरली होती. त्याला २०१० मध्ये ईव्हीएम चोरी प्रकरणी अटक झाली होती ही माहिती समोर आली.

हरिप्रदास २००९ पासूनच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र २००९ मध्ये आयोजित हॅकेथॉनमध्ये त्याला ईव्हीएम हॅक करता आले नव्हते. हरिप्रसाद याला २०१० साली ईव्हीएम चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाचा आक्षेप –
निवडणूक आयोगाने टीडीपीचा कायदेशीर कार्यभार सांभाळणाऱ्या पथकाला एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधिमंडळामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या एक्स्पर्टला जागा कशी काय देण्यात आली? असा प्रश्न विचारला आहे. तसेच याला उत्तर देण्याचेही निडणूक आयोगाने बजावले आहे.