TV अ‍ॅक्टरवर 50 गुडांचा हल्ला, पोलिसांचा 100 नंबर लागेना, पुढं झालं ‘असं’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही शो चंद्रगुप्त मौर्य फेम अ‍ॅक्टर पार्थ तिवारी सध्या चर्चेत आहे. पार्थवर 50 गुंडांनी हल्ला केला आहे. स्वत: पार्थनं फेसबुक लाईव्ह करत या घटनेची माहिती दिली आहे. पार्थनं हेही सांगितलं की, त्यानं मदतीसाठी पोलिसांच्या 100 नंबरवर कॉल केला. परंतु कॉल लागलाच नाही. यानंतर पार्थचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

आपल्यासोबत काय घडले हे सांगताना पार्थ म्हणाला, “मी मालाड वेस्टमध्ये छत्रपती शिवाजी राजे कॉम्पलेक्समध्ये रहातो. माझ्या बिल्डींगमध्ये एक माणूस रहातो ज्यानं दारू पिली होती. जेव्हा मी घरातून खाली जायला निघालो तेव्हा लिफ्टच्या दरवाज्यात माझ्याकडून त्याला धक्का लागला. मी त्याला सॉरी म्हणालो. मी सॉरी बोलूनही तो बडबड करत माझ्या मागे माझ्या गाडीकडे आला. मी त्याला पुन्हा सॉरी बोललो. त्यानंतर त्यानं मला शिवी दिली. नंतर तो ओरडू लागला मी पोलिसांना फोन केला. परंतु एकदाही पोलिसांचा फोन लागला नाही.”

पुढे बोलताना पार्थ म्हणाला, “नंतर मी त्या व्यक्तीवर हल्ला केला. आमची धक्काबुक्की झाली. तिथे अचानक 40-50 गुंडे आले. हे गुंडे अवघ्या 5 मिनिटात तिथे पोहोचले. सर्वांनी मला दगडं फेकून मारले. मी 40 लोकांशी एकटा लढलो. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. हे सगळं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.”

पार्थ सांगतो, “मी कसाबसा स्वत:ला वाचवत पोलिस ठाण्यात पोहोचलो. त्यांनी माझ्या हातावर डोक्यावर आणि इतरही अनेक ठिकाणी वार केले.” असंही पार्थनं सांगितलं.  पार्थनं या गुंडगिरीनंतर लोकांच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली आहे.

पोलिसांचा 100 नंबर न लागल्याबद्दल पार्थनं नाराजी दाखवली. त्यानं चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याआधी तो मालवनला ठाण्यात गेला होता. पार्थनं फेसबुक लाईव्ह केल्यानंतर त्या हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी चाहत्यांना विनंती केली आहे.

image.png