Chandrakant Khaire | ‘दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने 52 कोटी वाटले’, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आज मुंबईत शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांचा दसरा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2022) निमित्ताने दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. ठाकरे गटाचे समर्थक आणि शिंदे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत येत आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) व चंद्रकांत खैरे हे दखील दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येत आहेत. तत्पूर्वी विमानतळावर दोन्ही गटातील नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. परंतु शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला येणाऱ्यास प्रत्येकी 1000 रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे मागील काही दिवसांपासून शिंदे गटावर सतत टीका करत आहेत. खरी शिवसेना आमचीच असल्याचे सांगत मुख्यमंत्री (CM)आणि औरंगाबाद मधील शिंदे गटाच्या नेत्यांवर ते टीकास्त्र सोडत आहेत. खैरे यांच्यासोबत अंबादास दानवे यांनी देखील पक्षाची बाजू मांडत शिंदे गटावर हल्लाबोल केला.

दसरा मेळाव्यासाठी पैसे देऊन शिंदे गटाचे आमदार (MLA) गर्दी जमवत असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपेय शिंदे गटाचे आमदार देत असून त्यासाठी 52 कोटी रुपये
त्यांनी खर्च केलेत अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच शिंदे गटाचे आमदार हे गद्दार आहेत, या गद्दारांची शिवसैनिकांशी बरोबरी होऊ शकत नाही, असेही खैरे यांनी म्हटले.
मुंबईला जाण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी कर्णपुरा देवीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट येईल

अंबादास दानवे म्हणाले, गद्दारीच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आम्ही देवीकडे प्रर्थना केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेतून महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट येईल. दसरा मेळावा ऐतिहासिक असतो,
महाराष्ट्रात शिवाजी पार्क वरुनच विचारांचं सोनं लुटलं जात असतं, असे दानवे म्हणाले.

Web Title :- Chandrakant Khaire | 1000 to those who came to the gathering of dasara melava 52 crores till now a serious charge against chandrakant khair

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा फंडा; अ‍ॅमेझॉनच्या लिंकवरुन टास्क देऊन तरुणीला घातला सव्वा लाखांना गंडा

Chandrashekhar Bawankule | ‘उद्धव ठाकरेंचा संयम सुटलाय, ते बावचळलेल्या अवस्थेत’, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका