Chandrakant Khaire | ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांच्या पायाची धूळदेखील नाहीत’ – चंद्रकांत खैरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाच्या सोहळ्याला महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना केली होती. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून सुटका केली होती, त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून सुटका करून घेतली, असे लोढा म्हणाले होते. त्यावरून त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांच्या पायाची धूळदेखील नाहीत, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले आहेत.

 

लोढा यांनी महाराष्ट्र राज्यातील राजकीय बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली आहे. त्यामुळे वारंवार महापुरुषांचे अपमान करण्याचे प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे कोण आहेत? छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळसुद्धा नाहीत. या सांस्कृतिक मंत्र्याला मी सांगू इच्छितो की, यांना महाराष्ट्रातील मराठी संस्कृती माहिती नाही. ते बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) आहेत. यांनी काहीतरी मिळावे म्हणून असे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत.
त्यामुळे गोड गोड बोलून मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी आणि त्यांची स्तुती करण्यासाठी जर
हे असे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असतील, तर योग्य नाही.
आम्ही त्यांचा आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.

 

मी मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा शिवाजी महाराजांवर
वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्ये केल्याने तीव्र निषेध व्यक्त करतो, असे यावेळी खैरे म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Khaire | ‘Chief Minister Eknath Shinde is not even the dust of Shivaji Maharaj’s legs’ – Chandrakant Khaire

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर