शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा दावा, बाळासाहेबांकडे होती दैवी शक्ती

औरंगाबाद – पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरें नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. असतात. मात्र आज औरंगाबाद महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमांत त्यांनी अजब दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा त्यांनी त्यांनी केला आहे.

औऱंगाबाद महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील ४ बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी शनिवारी ते आले होते. त्यावेली पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा अजब दावा केला आहे.

काय म्हणाले खैरे

बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दैवी शक्ती होती. असा हास्यास्पद दावा त्यांनी केला. ते बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले की, मी वनमंत्री असताना बाळासाहेब यांना व्याघ्रप्रकल्पात घेऊन गेलो होतो. तेव्हा सगळे पोलीस अधिकारी होते.

अधिकारी म्हणाले पिंजऱ्याजळ त्यांना नेऊ नका. बाळासाहेब म्हणाले मला वाघ पाहायचा आहे. तेव्हा त्यांना मी एका वाघाच्या पिंजऱ्याजवळ घेऊन गेलो. त्यावेळी बाळासाहेबांनी त्या वाघासमोर हात ठेवला. तेव्हा त्याने हातावर पंजा मारला. बाळासाहेबांकडे खरी दैवी शक्ती होती हे मी तेव्हा पाहिले. हे अनुभवले आहे.

Loading...
You might also like