Chandrakant Khaire | मोदींच्या हातात सर्व यंत्रणा, देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचलाय, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप!

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Khaire | धनुष्यबाण हे शिवसेनेचे पक्षचिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये (Shiv Sainik) संताप व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपामुळेच (BJP) धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्याची भावना असल्याने शिवसैनिक (Shiv Sainik) आणि नेते आपला संताप त्यांच्यावरच व्यक्त करत आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) हा सगळा डाव रचल्याचा आरोप त्यांनी केला.

 

देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना चंद्रकांत खैरे म्हणाले, निवडणूक आयोग स्वायत्त असले, तरी केंद्र सरकारच्या (Central Government) हाताखाली काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सगळ्या यंत्रणा आपल्या हातात ठेवल्या आहेत. मंत्र्यांच्या हातातही काहीही नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे खास आहेत. देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचला आहे.

 

खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले, हे एक प्रकारचे संकट आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फार संयमी आहेत. संघर्ष करण्याचा त्यांचा पवित्रा असतो. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत राहू. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) शिवसेना (Shivsena) फोडली. फार मोठे पाप केले आहे या सगळ्या गद्दारांनी. आत्तापर्यंत धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या शिवसैनिकांचे मन दुखत आहे. आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू आणि पुन्हा जिंकून येऊ.

खैरे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू शकत नाही.
देवेंद्र फडणवीसांचे सरकार, मोदींचे सरकार जर हे सगळे करत असेल, तर जनता 2024 ला त्यांना दाखवून देईल.
यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचा हात आहे.
त्यांना मोदींचा पाठिंबा कितपत मिळतोय, हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीसांनी असे करायला नको होते.

 

ते म्हणाले, भाजपा असे सगळ्या राज्यातले विरोधी पक्ष संपवायला लागली, तर लोकशाहीचे काय राहिले?
हा लोकशाहीचा खून आहे. या सगळ्यांनी लोकशाहीचा खून केला आहे.

 

Web Title :- Chandrakant Khaire | shivsena chandrakant khaire slams devendra fadnavis on bow n arrow symbol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhanushyaban Symbol | ‘जनतेसोबत सैनिक गेले, इतके अनर्थ…’, धनुष्यबाण चिन्हावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्लांची महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर होणार नियुक्ती?

MP Supriya Sule | ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर…’ सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या-‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’