Chandrakant Patil | ‘पेट्रोल-डिझेल स्वस्त न होण्यासाठी अजित पवार जबाबदार’ – चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच राज्यातील जनतेला पेट्रोल-डिझेलसाठी (Petrol-diesel) अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावेळी पाटील हे हिंगोलीत (Hingoli) माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

इंधन दरवाढीमागील गणित समजावून सांगताना राज्य सरकारला (Maharashtra Government) आयते पैसे मिळत असल्याने त्यांनी इंधनचा समावेश जीएसटीमध्ये (GST) करण्यात नकार दिल्याची टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. त्यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ‘100 रुपये जेव्हा पेट्रोल-डिझेलचा दर असतो तेव्हा 35 रुपये हे खरेदी किंमत असते. त्यातून काही सूट देता येत नाही, कारण आपण काही लाख लीटर डिझेल पेट्रोल वापरतो. 50 पैसे जरी सूट दिली तरी केंद्र सरकारला (Central Government) विचार करावा लागेल. 65 रुपयांमध्ये निम्मा कर केंद्राचा आणि निम्मा राज्याचा असतो. असं ते म्हणाले.

Product Data Analysts | कोणत्याही पदवीशिवाय मिळवू शकता 61 लाख रुपयांची नोकरी, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

पुढे ते म्हणाले, केंद्राच्या करामध्ये कच्च तेल वापरण्यायोग्य करणं, देशभरात पोहचवणं या साऱ्या गोष्टींचा समावेश असतो. हे सगळं केंद्राच्या 32 रुपयांमध्ये येतं. राज्याच्या 32 रुपयांमध्ये काही येत नाही. 35 रुपये खरेदी किंमत वजा करता राज्य आणि केंद्राला 32.50 प्रत्येकी मिळाले. त्यापैकी केंद्राच्या पैशातून 20-22 रुपये खर्च झाले.

दरम्यान, इंधनाच्या करांमधील राज्याच्या वाटच्या 32.50 रुपयांमधून काहीच कमी झाले नाही तर राज्याने ते कमी करावेत. गुजरातने केले, गोव्याने केले. भाजपाच नाही तर काँग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तीसगडने केले. तिथे पेट्रोल डिझेल 20-30 रुपयांनी स्वस्त आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सल्ला दिला की एकच वस्तू जीएसटीच्या बाहेर आहे, ती म्हणजे पेट्रोल- डिझेल. ती वस्तू जीएसटीमध्ये घेतली की ताबडतोब 30-30 रुपयांनी पेट्रोल डिझेल कमी होईल. का विरोध केला अजित पवारांनी? तुम्हाला हा आयता 32.50 रुपयांचा मलिदा हवाय म्हणून विरोध केला ना तुम्ही? लोकांची काळजी तुम्हाला असेल तर तुम्ही डिझेल पेट्रोल जीएसटीमध्ये (GST) जाऊ द्या, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

रतन टाटा यांच्या TCS ला 7 व्यावसायिक दिवसात झाला 1.41 लाख कोटी रुपयांचा तोटा, गुंतवणुकदारसुद्धा झाले हैराण

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलची चढती ‘कमान’ कायम; जाणून घ्या आजचे दर

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Chandrakant Patil | ajit pawar refuse proposal of brining fuel under gst says chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update