‘आमची छाती फाडली तरी रामच दिसेल’, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर ‘पलटवार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेना भाजपापासून दुसरं गेलीय हिंदुत्वापासून नाही असे वक्तव्य आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रभू रामचंद्रासी नातं असल्याचं दाखवण्यासाठी शिवसेनेनला अयोध्येत जावं लागत,पण आमची छाती फाडली तरी त्यात तुम्हाला रामच दिसेल,अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्रांचा दर्शन घेतलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९५ वर्षांपूर्वी हिंदू राष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना मांडली आहे. आमचा हा सांस्कृतिक राष्ट्रवाद उद्धव ठाकरे यांना आधीपासून मान्य होता. आता जर तो काँग्रेस लाही मान्य असेल तर आनंदच आहे, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला.

भाजप म्हणजे हिंदुत्व न्हवे – ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्री रामचे दर्शन घेतल्यावर पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी बोलताना भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, आम्ही भाजपासून दूर झालोय हिंदुत्व पासून नाही,भाजप वेगळे आहे आणि हिंदुत्व वेगळं असा रामबाण त्यांनी भाजपवर चालवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात जाऊन भाजपाला डिवचल्याने भाजपचा खूप तिळपापड झालाय. ठाकरे यांच्या विधानानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका होत असून चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला