Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका करु लागले आहे. त्यानंतर आता पुण्यामध्ये पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बॅनर (Banner) लावण्यात आले आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘एका महिलेचा मतदार संघ (Constituency) चोरून आमदार झालेल्या मासणाकडून अजून काय अपेक्षा करणार?’ असा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात आला आहे. तर त्यापुढे हॅश टॅग चंपावाणी असा जाहीर निषेध बॅनर लावून सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हा बॅनर पुण्यातील साई चौक सुस रोड, पाषाण (Sus Road, Stone) येथे लावण्यात आला आहे.

 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
भाजपने काढलेल्या मोर्चात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. कशासाठी राजकारणात (Politics) राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची (CM) भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे ते म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्याकडून पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
तर सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनी देखील ट्विट करुन चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
या सर्व घडामोडीत पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी दिसून आली.

 

Web Title :- Chandrakant Patil | banner poster against bjp leader chandrakant patil in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चुलत भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

 

CP Amitabh Gupta | ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हा कायमच असला पाहिजे’

 

Stress Free Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने घ्या झोप, 4 तासांमध्येच 8 तासांची झोप होईल पूर्ण