Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आधी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मारली ‘बाजी’, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे खूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरू असून लवकरच त्यांच्यावर मी पीएचडी करणार आहे, असे राजकीय वक्तव्य काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांचे (Chandrakant Patil) पीएचडीचे हे वक्तव्य राजकीय शेरेबाजी असली तरी प्रत्यक्ष पीएचडी (PhD) करण्याच्या बाबतीत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कोथरूडच्या भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former BJP MLA Medha Kulkarni) यांनी मागे टाकले आहे. कारण कुलकणी यांनी खरोखरची पीएचडी मिळवली आहे.

 

भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि भाजपाच्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule Pune University)
‘शाळा सिद्धी समृद्ध शाळा’ या विषयात पीएचडी (PhD) केली आहे. त्यांनी शासनाच्या शाळा मुल्यमापन उपक्रमावर हे संशोधन केले आहे.
यासाठी त्यांना डॉ. ललिता वर्तक यांनी मार्गदर्शन केले. स्वता ट्विट करत कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.

 

दरम्यान, मेधा कुलकणी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.
राजकारण समाजकारणासारख्या व्यस्ततेच्या क्षेत्रात कार्यरत असताना पीएचडी प्राप्त केली हे गैरवास्पद आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

मेधा कुलकर्णी 2014 मध्ये कोथरूड विधानसभा मतदरसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या होत्या.
परंतु 2019 ला विधानसभेच्या निवडणूकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून तिकिट मिळाल्याने त्यांचे तिकिट कापले गेले. यानंतर मेधा कुलकर्णी फारशा चर्चेत नव्हत्या.
यानंतर त्यांच्यावर महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

 

Web Title : Chandrakant Patil | Before BJP state president Chandrakant Patil, former MLA Medha Kulkarni done Phd, find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर ‘अब तक 56’ ! ‘या’ कारणामुळं ‘सेल्फी पॉईंट’जवळ अपघात होत असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्टचं सांगितलं (व्हिडीओ)

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 98 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना