Chandrakant Patil | ‘बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात वारंवार आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. अनेक गोष्टीवरून टीकाटिपणी होत असते. दरम्यान भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कारवर दगड आणि शाई फेकल्याची घटना घडली. सोमय्या यांनी शिवसनेच्या कार्यकर्त्यांने हा प्रकार केला असल्याचा आरोप केला आहे. या प्रकारावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?, अशा शब्दात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीकेची झोड शिवसेनेवर उठवली आहे.

किरीट सोमय्यावर (Kirit Somaiya) झालेल्या हल्ल्यावरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
त्यावेळी पाटील म्हणाले, की ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली.
आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा.
असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

‘जनतेची फसवणूक करून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर केलेले घोटाळे आणि कारनामे लपवण्याच्या
उद्देशाने, महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सतत आवाज उठवणारे भाजपाचे ज्येष्ठ आणि संघर्षशाली नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.
” असं देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

शुक्रवारी वाशिम (Washim) दौऱ्यावर असणारे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी टार्गेट केलं.
किरीट सोमयानी ट्विटरवरुन शिवसेना खासदार भावना गवळी (Shiv Sena MP Bhavana Gavali) आणि समूहाचा शंभर कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार असल्याचं म्हटलं होतं.
यावरून संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना टार्गेट केलं आहे.
दरम्यान, सोमय्या यांनी वाशिममध्ये घडलेला सर्व प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमांतून सांगितला आहे.

 

Web Title : Chandrakant Patil | bjp chandrakant patil slam shivsena bhawana gavali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | तुम्हाला सुरू करायचा असेल आपला बिझनेस तर मोदी सरकार देतंय 25 लाख रुपये, 31 पूर्वी येथे करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

Burglary in Pune | बाणेर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी, सव्वापाच लाखाचा ऐवज लंपास

Contactless Service | SBI ने 44 कोटी ग्राहकांना ‘या’ 2 आवश्यक नंबरची दिली माहिती, जाणून घ्या