Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना इशारा, म्हणाले – ‘… तर तुमची पोलखोल करणार’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. जे करायचे नाही, त्याचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्यासाठीच शरद पवार हे मराठा आरक्षणाबाबत गावोगावी सभा घेणार आहेत. पण या खोटं बोल पण रेटून बोल सभांची पोलखोल भाजप (BJP) करेल. त्यासाठी ते जिथे सभा घेतील, तेथे आम्ही सभा घेऊ, असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रश्नामध्ये 50 टक्के अटीचा अडथळा येणार आहे, आरक्षण देण्यात केंद्राची भूमिका अडचणीची ठरत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच गावोगावी जाऊन सभा घेऊन यासंदर्भातील वस्तू स्थिती मांडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापुरात (Kolhapur) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावताना म्हटले, गावोगावी जाण्यापेक्षा मंत्रालयात एकत्र बैठक बोलवा, मग खरे कोण आणि खोटं कोण हे सर्वांना समजेल.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी केलेले विधान मती गुंग करणारे आहे. सत्याचा सामना करता येत नसेल तर गोंधळात टाकण्याची नीती वापरली जाते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पाठोपाठ पवार देखील हीच नीती वापरत आहेत. 50 टक्के आरक्षणाची अट रद्द झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, असं ते सांगत आहेत. मग 58 वर्षे केंद्रात व राज्या तुमचीच सत्ता होती, तेव्हा ही अट रद्द का केली नाही, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची दोन्ही काँग्रेसच्या (Congress) नेत्यांची इच्छा नव्हती.
जे करायचे नाही, त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडायचे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे (OBC reservation) प्रकरण अंगलट आल्याने शरद पवार खोटं बोलण्यासाठी सभा घेणार आहेत.
पण ते जिथे सभा घेतील, तिथे आम्ही सभा घेऊन त्यांची पोलखोल करु, असा इशारा पाटील यांनी दिला.

Web Title :- Chandrakant Patil | bjp chandrakant patil warns ncp sharad pawar again

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BHR Scam | कर्जाची 20% टक्के रक्कम 10 दिवसांत भरण्याचे न्यायालयाचे आदेश; भाजप आमदार चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Eatable Vaccine | हे असेल भविष्य…! व्हॅक्सीन-औषधांसाठी डॉक्टर सांगतील तुम्हाला वनस्पतींची नावे!

Pune News | पुण्याच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने, हॉटेल अन् बार रात्री ‘या’ वेळेपर्यंत सुरू राहणार, निर्बंध शिथिल