Chandrakant Patil | ‘सरकार तुमचं असताना अन्याय-अन्याय म्हणून का ओरडायचं?’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | मुंबई ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच नवाब मलिक यांच्याकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील आरोप होतो आहे. असा दावा भाजप (BJP) करीत आहे. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ‘सरकार तुमचा आहे तर मग चौकशी करा. आरोप करण्यात वेळ का घालवत आहात. संजय राऊत (Sanjay Raut) कमी होते का? आता नवाब मलिक ट्विट करायला लागले आहेत. सरकार तुमचं असताना तुम्हीच अन्याय -अन्याय म्हणून का ओरडायचं असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना भाजपला मध्ये ओढण्याचे काम करत आहेत. कुठलाही पुरावा सादर न करता फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुढे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमधील अनेक मंत्री गायब असल्याचे दिसून येत आहे.
राठोड घरी बसून आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने आरोप केल्याचे समोर आले आहे.
अनिल देशमुख बेपत्ता आहेत. त्या सर्वांना सोडून वानखेडेंची काळजी करू नका.
त्यांच्या मागे समाज अतिशय ठामपणे उभा राहील.
आताचे गृहमंत्री असताना तुम्हाला पत्रकार परिषद का घ्यावी लागत आहे.
चौकशी केल्यावर दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’