Chandrakant Patil | ‘… तर राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राज्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या मोठ्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण निर्माण झालं आहे. शिंदे गट भाजपसोबत (BJP) युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राज्यात पसरली आहे. दरम्यान राज्यातील भाजपचे नेते यावर कोणतीही खुली प्रतिक्रिया देत नाहीत. असं दिसत आहे. या घडामोडीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. आमची 13 जणांची कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करुन सांगतो,” असं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, ‘शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर, संजय राऊतांना (Sanjay Raut) नेमकं काय म्हणायचे ते मला माहिती नाही. ते सकाळी एक बोलतात दुपारी वेगळचं म्हणतात,” असं देखील पाटील म्हणाले.

“सत्ता परिवर्तनाबद्दल मला काही माहित नाही. सध्या आम्ही राज्यातील 16 मतदारसंघात काम करत आहोत. राज्यातील घटनांशी आमचा काही संबंध नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांनी नेमकं काय वक्तव्य केलं याबद्दल मला काही माहित नाही. महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, पण आमच्या सगळ्या नेत्यांना उत्तर देण्याचे अधिकार आहेत.” असं ते म्हणाले.

 

पुढे ते म्हणाले, “मोहीत कंबोज (Mohit Kamboj) सगळ्यांचाच मित्र आहे. तो एकनाथ शिंदे यांचा देखील मित्र आहे.
मोहित कंबोज तिकडे गेल्याबद्दल मला काही माहित नसल्याचे ते म्हणाले. दिसला असेल तर त्याचे सगळ्याच पक्षात मित्र आहेत.”
दरम्यान, पुढे पाटील म्हणाले, “विधानपरिषद आणि राज्यसभेच्या विजयानंतर लोकांना खूप आनंद झाला आहे.
गावोगावचे लोक देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला येत आहेत. अपक्ष जे आमच्याबरोबर आहेत.
त्यांना विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दबाव आला असल्याचे,” ते म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil comment on maharashtra politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा