Chandrakant Patil | ‘तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे, शिवसेना – काँग्रेस मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या’ – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकांच्या (Kolhapur Assembly By – Election) पार्श्वभुमीवर भाजप – काँग्रेस (BJP-Congress) आमने सामने आले आहे. एका माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) जोरदार निशाणा साधला आहे. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) खरंच बोलले. महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीच (NCP) चालवतंय. शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांनी, आमदारांनी फक्त गाड्याचं फिरवायच्या’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

 

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते आणि कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे.
दरम्यान, ही निवडणुक भाजप आणि काँग्रेस यांच्यात अधिक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

 

दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”कोल्हापूर उत्तरसाठी (Kolhapur North) भाजपच्या सत्यजित कदम (Satyjeet Kadam) यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे.
जनतेच्या मनात पंतप्रधान मोदीच विराजमान झाले आहेत. त्यामुळे विकासाच्या कामावर सत्यजित कदम विजयी होतील.
राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिस यंत्रणेचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी होत आहे.”

कालही सांगलीत (Sangli) अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणात हे समजले आहे.
स्मारकाचं काम सांगली महापालिकेतील (Sangli Municipal Corporation) भाजप नगरसेवकांनी पूर्ण केलं आणि उद्घाटन शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करून भाजपाला बोलवणार नाही अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता होती.
मात्र काल तो लोकार्पण सोहळा पार पडला आहे.
महाविकास आघाडीची अनेक बाबतीत दडपशाही सुरु असल्याचंही,’ पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil criticised on mahavikas aaghadi govt run by
only ncp ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा