Chandrakant Patil | ‘अजित पवार हुशार राजकारणी, वेळ मारून नेतात’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात अनेक कारणांवरुन आरोप प्रत्यारोप होताना दिसत असतात. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली आहे. ‘अजित पवार हे हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, ”काँग्रेसचे 25 ते 26 आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या इतर अनेक आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडत अर्थसंकल्पीय सत्रात बसणार नाही असे निवेदन उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलं. त्यामुळे या आमदारांची समजूत काढण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी देण्यात आला. असा निधी देता येत नाही. परंतु, अजित पवार हे अतिशय हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात,” अशी टीका त्यांनी केली.

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी ज्यावेळी परळीमध्ये (Parli) जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांच्या गाडीच्या डिकीत रिव्हाॅल्वर ठेऊन त्यांना 15 दिवस तुरुंगात टाकले. न्यायासाठी करूणा शर्मा यांनी अक्षरश: आक्रोश करून देखील त्यांना न्याय मिळाला नाही,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil criticism of ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा