Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Chandrakant Patil | भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस (NCP) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस (Congress) नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

 

महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला.
मात्र कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं.
कृती समिती शासनासोबत डील करतं असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सहकारमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) पोहोचले होते.
यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

 

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं.
एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच, राष्ट्रवादी जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil criticize ncp and congress party in solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pomegranate | रोज ‘हे’ फळ खाल्ले तर होतील तब्बल 24 आरोग्यदायी फायदे, डायबिटीज-आर्थरायटिज आणि हृदयरोग राहतील दूर

Sangli Crime | सोन्याचे दागिने पळवणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश; सांगली गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Crime | ST बसमध्येच गळफास घेत चालकाची आत्महत्या; अहमदनगरमध्ये खळबळ (व्हिडीओ)