Chandrakant Patil | शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, चंद्रकांत पाटलांचा पलटवार (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्र सरकारने (Central Government) सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या विधानावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचे ‘नाचता येईना आंगण वाकडे’ म्हणत पवार हे केंद्राकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आलेली ऑफर न स्वीकारण्याइतके कच्चा गुरुचे चेले नाहीत, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला. ते नागपूरमध्ये बोलत होते.

Arthritis Disease | सावधान ! केवळ ज्येष्ठांमध्ये नव्हे, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील होऊ शकतो हाडांचा ‘हा’ भयंकर आजार

शरद पवार यांनी आपल्याला केंद्रातील भाजपकडून सत्तेसाठी ऑफर (Central Government offer to NCP) आली होती मात्र आपण ती स्वीकारली नाही. त्यामुळे तपास यंत्रणेकडून राष्ट्रवादीच काँग्रेसला त्रास दिला जातोय, असे पवार यांनी म्हटले होते. यावर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्राकडून आलेल्या ऑफरला (Offer) नाही, म्हणण्याइतके पवार कच्चा गुरुचे चेले नाहीत. केंद्राबरोबर असलेल्या सरकारबरोबरच महाराष्ट्रातील सरकार (Maharashtra Government) स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं. असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

राज्यातील कोळसा (Coal) टंचाईवरुन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कोल इंडियाचं देशातील वीज प्रकल्पांतील (power projects) कोळसाटंचाईला आणि पर्यायाने वीज टंचाईला (power shortage) जबाबदार आहे आणि या विषयावर भाजप नते देशाची दिशाभूल करत असल्याचे राऊत म्हणाले होते. यावर बोलताना केंद्राने कोळसा दिला नाही म्हणून वीज कमी निर्माण होणार आहे असे म्हणत आहेत. पण हे सांगणार नाही की, केंद्राने आग्रह धरला होता की पावसामुळे कोळसा कमी मिळेल. वेळीच साठा करा पण तो आम्ही केला नाही हे सरकार सांगणार नाही. पवार हे सगळ्यांचे गुरु असल्यामुळे आणि त्यांचे शिष्य काहीही झालं की त्याचा दोष केंद्र सरकारला देऊन मोकळे होतात, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.

हे देखील वाचा

Ranveer Singh | बॉलिवूडचं लव्ह बर्ड ! रणवीर सिंग स्वतःला म्हणतो ‘Husband Of The Century’; जाणून घ्या कारण

Black death | पुन्हा पसरू शकते ’ब्लॅक डेथ’ नावाची महामारी, रशियन डॉक्टरने दिला इशारा

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil on sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update