Chandrakant Patil | शरद पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल, म्हणाले – ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (सोमवार) मेट्रोचा (Pune Metro) प्रवास केला. शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) ते फुगेवाडी (Phugewadi) दरम्यान मेट्रोनं प्रवास करुन मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी असा प्रवास त्यांनी केला. दरम्यान, शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका करत आक्षेप घेतला आहे. आमदारांनी मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणला पाहिजे, असा संताप चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला आहे.

 

पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल (Metro Trial) कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय असा माझा प्रश्न आहे. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? 11 हजार कोटींच्या या प्रकल्पामधील 8 हजार कोटी केंद्राने दिले आहेत. कोविडमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का ? असा सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला आहे.

आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का ? केंद्रात 10 वर्षे आणि राज्यात 15 वर्षे राज्य असताना तुम्ही हा प्रकल्प का केला नाही? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री (CM) झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
त्यामुळे मी सर्व आमदारांना आवाहन करतो की, त्यांनी मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात प्रकल्प लांबला आहे.
शरद पवारांना मला दोष द्यायचा नाही पण मेट्रोवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे आले होते.
याची माहिती प्रसारमाध्यमांना नव्हती. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील याची माहिती ऐनवेळी सकाळी देण्यात आली होती.
असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी सांगितले.
शरद पवारांच्या मेट्रो प्रवासादरम्यान आमदार आण्णा बनसोडे (MLA Anna Bansode), शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे (Nana Kate), विशाल वाकडकर, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित (Brijesh Dixit) उपस्थित होते.

 

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil question after sharad pawar pimpri chinchwad pune metro trial

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा