Advt.

Chandrakant Patil | ‘हे सरकार गेंड्यापेक्षा ही जास्त असंवेदनशील’ ! राज्यातील निर्बंधावरुन चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) कडक निर्बंध (Strict Restrictions) लागू केले आहेत. त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलवायला हवी होती. पण तसे झाले नाही. रात्रीच्या उद्योगांवर निर्बंध आणले. आणायचे असतील तर दिवसा चालणाऱ्या उद्योगांवरही आणा. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे. त्यामुळे जास्त निर्बंध लावून चालणार नाही. लोकांनी कोणती काळजी घ्यावी हे सांगाव निर्बंध लावू नये असे मतही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी व्यक्त केले.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राज्यात केवळ पाच पक्ष आहेत.
त्यामुळे सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती पण तसे झाले नाही.
सरकारला विरोधी पक्षांना (Opposition Parties) विचारात घ्यायचे नसतं.
केवळ मनमानी कारभार चाललाय.
सर्वजणांना राहू दे किमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना तरी बोलावायचे शासकयीदृष्ट्या ते शासनाचा भाग आहेत. असेही ते म्हणाले.

 

राज्य सरकारकडून सत्यानाश सुरु असल्याने सर्वसामान्य माणूस गोंधळलेला आहे.
कधी शाळा सुरु तर कधी बंद, कधी परीक्षा ऑनलाइन (Exam Online) तर कधी ऑफलाइन (Offline) असे सुनावत सर्वजण एकत्रित बसून नियमावली तयार करून जाहिर करा.
चंद्रपुरात वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) एक बोलणार, जालन्यात टोपे (Rajesh Tope) वेगळेच सांगणार तर मध्येच अजित पवार (Ajit Pawar) वेगळंच बोलणार, रोज नवीन घोषणा करण्यापेक्षा एक काय ते ठरवा.
लोकांना घाबरवू नका. तज्ज्ञांना बोलू द्या, हे सरकार गेंड्यापेक्षा ही जास्त असंवेदनशील झालंय,
अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.

 

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरही टीका केली.
ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात कोरोना काळात जे मुख्यमंत्री मैदानात उतरले नाही ते आता तर त्यांची तब्येत बरी नसल्याने का येतील,
अशा शब्दात पाटील यांनी टीका केली.

 

Web Title :-  Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil reaction on new covid omicron restriction by state government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ambani Family | अंबानी कुटुंबाला बॉलिवूडच्या टॉपच्या ‘या’ कलाकारामुळे करोडो रुपयांचा फटका, का होतेय एकच चर्चा?

 

Coronavirus Restrictions In Maharashtra | … तर वॉईन शॉप, दारुची दुकाने बंद करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

 

Protect Against Omicron Covid Variant | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर WHO ची गाईडलाईन आवश्य करा फॉलो, तेव्हाच राहाल सुरक्षित

 

Girish Mahajan | गिरीश महाजन ‘गोत्यात’? पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दाखल; जाणून घ्या प्रकरण