Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची CM उद्धव ठाकरेंना विनंती, म्हणाले – ‘संजय राऊतांना जरा आवरा, शिवसेना संपवण्याचा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एखाद्या माणसाला आपल्या पायाखालची वाळू घसरली की, आपण आजपर्यंत जे केलं ते उघड पडलेलं आहे आणि कारवाई (Action) होईल. तसेच आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबातील लोकांवर देखील कारवाई होईल, अशी भाती वाटल्यानंतर माणूस सैरभैर होतो. अशीच स्थिती आता संजय राऊत (Sanjay Raut) यांची झाली आहे. त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला (Maharashtra Culture) लाजवणारी विधान (Shameful Statement) करत आहेत आणि शिवराळ भाषा वापरत आहेत, अशी प्रतिक्रीय भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

 

शिवसेना संपवण्याचं कॉन्ट्रॅक्ट
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मी मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विनंती करत आहे की, त्यांना जरा आवरा, संजय राऊतांनी शिवसेना (Shivsena) संपवण्याचं कॉन्ट्रॅक्ट (Contract) घेतल्यासारखं दिसतंय. त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा बिघडत आहे. तुम्ही संजय राऊतांना आवरा अशी विनंती त्यांनी उद्धव ठाकरे यांना केली आहे. तसेच मागील 27 महिन्यात शिवसेनेचे एकही प्रवक्ते बोलताना दिसले नाहीत. अनिल देसाई (Anil Desai), रामदास कदम (Ramdas Kadam), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापैकी कोणीच बोलत नाही. एकमेव प्रवक्ते त्यांना एकच काम मोदींना शिव्या, केंद्राला शिव्या, राज्यपालांना (Governor) शिव्या यातून शिवसेनेची प्रतिमा बिघडत असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले.

बाळासाहेबांनी कधी शिवीगाळ केली नाही
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना शिवी दिली होती. याचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे सुद्धा कडक शब्दात बोलायचे, पण ते शिवीगाळ करत नव्हते. परवा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी एक शिवी वापरली.

 

यावेळी उपस्थित पत्रकांरांनी आज राऊतांनी*शब्द वापरला असल्याची आठवण करुन दिली. यावर बोलताना ते म्हणाले, संजय राऊत हा शब्द अनेक वेळा वापरतात. त्यामुळे मला एक वाटत की जोपर्यंत उद्धवजींना राज्य चालवायचं आहे, जोपर्यंत त्यांच्याकडे राज्य आहे. तोपर्यंत त्यांनी राज्य चालविताना बिघडत चाललेल्या या संस्कृतीचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

2024 मध्ये भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल
आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM KCR) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.
यावर बोलताना पाटील म्हणाले की, 2019 ला असेच सर्व पक्ष एकत्र आले होते.
मतमोजणीच्या वेळी सर्वजण नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले होते. मात्र, त्यांचं मग काय झालं, ते देशाने पाहिले.
आता 2024 मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपला 400 हून अधिक जागा मिळतील असा दावा त्यांनी केला.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil requested udhhav thackrey to stop sanjay raut from using abusive language

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | घटस्फोटानंतर राखी सावंतला करायचंय ‘या’ क्रिकेटरशी दुसरं लग्न

 

Pune NCP | राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी गिरीश गुरुनानी यांची निवड

 

K Chandrashekar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत