Advt.

Chandrakant Patil | ‘उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज…’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Season) आजपासून (बुधवार) सुरू झाले आहे. या अधिवेशनात प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उपस्थित नाहीत. या पार्श्वभुमीवर भाजपने (BJP) जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी चार्ज कुणाला तरी द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर त्यांचा विश्वास नाहीये, हे स्वाभाविक आहे. कारण चार्ज घेतला तर सोडणारच नाही. आदित्य ठाकरेंकडे (Aditya Thackeray) चार्ज द्यावा. राज्याला मुख्यमंत्री नाही, सभागृहाला मुख्यमंत्री नाही. सह्या करायला मुख्यमंत्री नाही ही स्थिती राज्याच्या हिताची नाही. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

 

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे थेट चार्ज देता येणार नाही. आधी त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल. ज्याने शपथ घेतलीय अशाच व्यक्तीकडे चार्ज द्यावा लागतो. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला काही हरकत नाही पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात,’ असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला.

 

दरम्यान, ‘आज अधिवेशनात खूप मुद्दे आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडले जात आहेत. वादळामुळे हैराण आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करणार आहोत. परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचाराचे सुद्धा प्रश्न आहेत.’ असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil said if uddhav thackeray decide rashmi thackeray will be cm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा