Chandrakant Patil | ‘मला आमदारकी नितीन गडकरींमुळे मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाहांमुळं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कथित प्रवासातील वाटचाल आणि कथित किस्से सांगितले आहेत. त्यावेळी पाटील हे एका मुलाखतीदरम्यान बोलत होते. राजकीय जीवनात आमदारकी मिळाली ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामुळे मिळाली असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचादेखील आपल्या राजकीय जीवनात मोलाचा वाटा आहे. कर्तृत्व हा भाग बाजूला केला तर सरकार असताना मला जे काही मिळालं ते अमित शाह यांच्यामुळेच मिळालं आहे. असं पाटील यांनी सांगितलं.

 

एका मुलाखती दरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, जावडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील परंपरागत जागा गेली ती तुमच्या जनसंपर्कामुळे खेचून आणू शकता असं म्हणत त्यांनी थेट घोड्यावरच बसवलं. त्यावेळी निवडणूक हा विषयदेखील कळत नव्हता. अस पाटील म्हणाले. कर्तृत्व हा भाग बाजूला केला तर सरकार असताना मला जे काही मिळालं ते अमित शाह यांच्यामुळेच मिळालं आहे. याबाबत आपल्या मनात तिळमात्र शंकाही नाही. विधान परिषदेचा नेता कोण व्हावा याबाबत अमित शाह यांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. वरच्या सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटीलच बनतील असं अमित शाह यांनी सहजरित्या फडणवीस यांना सांगितलं. 2014 ते 2019 या कालावधीत मला जे काही मिळालं त्यासाठी जी एक साथ आवश्यक होती तीही अमित शाह यांनी दिलं.

 

पुढे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं की, सावली नावाच्या एका संस्थेचं मोठं काम करण्याचं भाग्य मला लाभलं. बेडवर असलेल्या रुग्णांची सेवा करण्याचं काम या संस्थेद्वारे करण्यात येतं. त्यावेळी एका भाड्याच्या बंगल्यामध्ये 90 जणांची व्यवस्था करत होते. त्यावेळी मी त्यांना इमारत बांधण्याचा सल्ला दिला. परंतु इमारत कशी बांधायची हा प्रश्न होता. नंतर आम्ही घरोघरी डबे दिले आणि त्यात रद्दी विकून पैसे टाकण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, आमदार झाल्यानंतर वाढदिवसाला अनेक लोक पुष्पगुच्छ, हार घेऊन भेटायला येणार याची कल्पना होती.
त्यावेळी मी त्यांना यासाठी लागणारे पैसे वाया न घालवता रद्दी देण्याची विनंती केली.
ती रद्दी विकून 1 रूपया आला तर मी 1 रुपया त्यात टाकणार असं ठरवलं.
महिलांना प्रशिक्षण देणारी देशातील सर्वात मोठी एक संस्था आहे त्यांनी आमच्याकडे एक प्रोजेक्टर मागितला होता.
त्याची किंमतही 34 हजार होती आणि तेही आमच्याकडे नव्हते.
रद्दीच्या पैशातून आपण त्यांना प्रोजेक्टर देऊ असं सांगितलं.
परंतु त्यावेळी ती रद्दी इतकी जमली की प्रोजेक्टरचे पैसे देऊनही 8 हजार रूपये उरले. असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil said today what i m because nitin gadkari and home minister amit shah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | निराधारांसाठीच्या योजनांचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळेल ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन; माजी आमदार मोहन जोशी यांनी केला पाठपुरावा

Life Certificate | तुमची पेन्शन SBI मध्ये येते का? घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे जमा करा जीवन प्रमाणपत्र, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Post Office Savings Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! 5 हजार गुंतवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा 16.25 लाख रुपये