Chandrakant Patil | ‘अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही, कारण…’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या (Sant Tukaram Maharaj Temple) शिळेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषणाची संधी मिळाली नाही. यावरून सत्ताधारी नेत्यांनी भाजपवर (BJP) टीका केली. या पार्श्वभूमीवर वादाला तोंड फुटलं असून यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खुलासा केला आहे. देहूतील कार्यक्रमांमधून वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. देहूतील कार्यक्रमांमधून वाद निर्माण करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताने इशारा करत अजित पवार यांनी बोलावं असं सांगितलं होतं, मात्र मी बोलणार नाही असं अजित पवार यांनी आधिच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या अपमानाचा विषय नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.

 

भाजप प्रदेश कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक झाली. विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election) आणि लोकसभा प्रवास अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
या बैठकीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
यामध्ये झालेल्या चर्चेबाबत पाटील म्हणाले, विधान परिषदेत भाजपचा गुलाल उधळला जाणार आहे.
भाजपमध्ये जातीचे राजकारण होत नाही. विधान परिषदेसाठी पूर्व योजना तयार केली असून यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

देहु येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले.
ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं.
मात्र सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil says ajit pawar chance to speech from pm modi but he dont talk

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा